रेल्वे प्रवास हा अजिबात सोपा नाही. रेल्वे प्रवास करताना सतत जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. नेहमी सतर्क राहावे लागले. आपली एक चूक आपल्याच जीवावर बेतू शकते. रेल्वे अपघाताच्या अनेक घटना चर्चेत येत असतात. अनेकदा लोक आपल्या चुकांमुळेच आपला जीव संकटात टाकतात. अनेकदा अपघाताचे व्हिडिओ देखील सोशल मिडिया व्हायरल होत असतात जे पाहून अंगावर काटा उभा राहतो. असाच एका रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसते की, रेल्वे पोलिसांनी कशाप्रकारे माय-लेकराचा जीव वाचवला आहे. रेल्वे पोलिसांच्या प्रंसवधानामुळे त्यांचा जीव वाचवला आहे. व्हिडिओ पाहून रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे.

रेल्वे पोलिसांच्या प्रंसगवधानामुळे वाचला माय-लेकराचा जीव

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, रेल्वे स्थानकावर एक लोकल धावत आहे. रेल्वे पोलिस देखील रेल्वे स्थानकावरच उभे आहे. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांवर त्याचे लक्ष आहे. तेवढ्यात रेल्वे स्थानकावर एक लहान मुलगा आणि त्याची आई स्थानकावरून सुटलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते अन् दोघांचाही पाय घसरतो. दरवाज्याला पकडून ठेवल्याने दोघंही लोकलसह काही अंतरावर खेचले जातात. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलि‍सांचे माय-लेकराकडे लक्ष जाते आणि तातडीने पळत जाऊन ते दोघांनाही पटकन मागे खेचतात. रेल्वे पोलि‍सांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस तेथे नसते तर आई-मुलगा दोघांनीही आपला जीव गमावला असता. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे.

We need such a shortcut at every important intersection in Pune
“पुण्यात प्रत्येक महत्त्वाच्या चौकात असा शॉर्टकट पाहिजे!”, काय म्हणता पुणेकर, Viral Videoवर कमेंटचा पाऊस
Video shows on rose day husband Plan Surprise for wife
‘राँझना हुआ मैं तेरा…’, बाबांनी आईला फिल्मी स्टाईलमध्ये…
Shocking video of Kumbh Mela : A pile of shoes in the holy triveni sangam
Video : “गंगेत स्नान करण्यापेक्षा गंगा स्वच्छ करा..” पवित्र त्रिवेणी संगमात चपलांचा ढीग, कुंभमेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Alcohol at office
कर्मचाऱ्यांना मद्यही मिळतं अन् हँगओव्हरसाठी सुट्टीही; या कंपनीनं दिली भन्नाट ऑफर; पण आधी कारण तर ऐका!
Pune video
Video : पुण्यातील प्रत्येक महिलेनी पाहावा हा व्हिडीओ, महिला पोलीसाने सांगितले अडचणीच्या वेळी काय करावे?
Bull on a city bus in Jaipur passengers shocked as bull suddenly entered in bus shocking video
नजर हटी..दुर्घटना घटी..प्रत्यक्षात पाहायचंय? प्रवासी फोनमध्ये व्यस्त अन् बसमध्ये शिरले बैल; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल
Shocking video of Robbery thief stole money from shop video viral on social media
अशी चोरी तुम्ही कधीच पाहिली नसेल! दुकानाच्या मालकासमोरच नोटांचा बंडल चोरला अन्…, चोरीचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Puneri Pati Funny Video
“त्राण गेलेल्या संगणकात प्राण…” पुणेकर दुकानदाराच्या जाहिरातीची विनोदी पाटी; वाचून हसाल तुम्हीही पोट धरून
A Little boy is suffering from blood cancer
Video : एवढं वाईट कोणाबरोबरही होऊ नये! एवढ्याशा चिमुकल्याला आहे ब्लड कॅन्सर, व्हिडीओ पाहून पाणी येईल डोळ्यांत पाणी

हेही वाचा –“लालपरी नव्हे ही तर….”, Viral Video पाहून तुम्हीही कराल कलाकाराचे तोंडभरून कौतुक

येथे पाहा Viral Video

हेही वाचा –“जिंकलंस भावा!”, ‘मुकाबला मुकाबला’ गाण्यावर अफालतून नाचतेय ‘ही’ व्यक्ती! थेट प्रभु देवाला दिली टक्कर

नेटकऱ्यांनी केले रेल्वे पोलिसांचे तोंडभरून कौतुक

इंस्टाग्रामवर लय भारी नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रेल्वे पोलि‍सांच्या प्रसंगावधानाने वाचले आई आणि मुलाचे प्राण! तसेच व्हिडीओच्या स्क्रिनवर हे आहेत खरे हिरो, दोन जीव वाचवणार्‍या या पोलीस जवानाला सलाम असा मजकूर लिहिलेला दिसत आहे.”

व्हायरल व्हिडीओ पाहून हे लक्षात घ्यायला हवे की, रेल्वेने प्रवास करताना कधीही घाई करू नये. आपला जीव अत्यंत मौल्यवाना आहे. त्यामुळे नेहमी सावधिगीरी बाळगली पाहिजे.

Story img Loader