सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ हे फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात. तर काही व्हिडीओ हे एकदम खरे असतात. जे पाहून थक्क व्हायला होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अगदी खरा असल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ एका बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा असून सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ व्हॅलेंटाइन डे चा असल्याचं समजत आहे. या व्हिडिओत एक तरुणी दिसत आहे आणि तिच्यासोबत एक महिला देखील आहे, जी कोणालातरी शोधत आहे. त्याचवेळी बाजूच्या घरातील व्यक्ती ही घटना आपल्या फोनमध्ये रिकॉर्ड करत आहे. याचवेळी हा व्यक्ती तरुणीच्या आईला तिचा बॉयफ्रेंड कुठे लपलाय हे इशाऱ्यावरून सांगतो. त्यानंतर तरुणीची आई तिच्या लपलेल्या बॉयफ्रेंडला शोधून काढते आणि चप्पलेने मारू लागते. दरम्यान बॉयफ्रेंड कसाबसा पळ काढतो. पण यामध्ये तरुणी एकटी अडकते. त्यांनतर तरुणीची आई तिला चप्पलेने मारायला सुरूवात करते.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: Video: तरुणीचा जीवाशी खेळ! ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं अन्…)
हा व्हिडीओ @gharkekalesh या नावाच्या अकाउंट वरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकजणांनी यावर भरभरून कंमेंट केल्या आहेत.