सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज हजारो लाखो व्हिडीओ पाहिले जातात आणि अपलोड केले जातात. त्यातील काही तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला भावूक करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो यापेक्षा खूप वेगळा आहे. हा व्हिडीओ एका लहान मुलीचा आणि तिच्या आईचा आहे. या दोघी खरेदीसाठी किराणा दुकानात पोहोचलेल्या असतात होते. इथे ही चिमुरडी आईला चिप्स घेण्यासाठी सांगते. पण आई चिप्स घेण्याला साफ नकार देते. यानंतर या चिमुरडीने तिची अशी हुशारी दाखवलीय की याची तुम्ही कधी कल्पनाच केली नसेल.
हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. काही तासांमध्ये या व्हिडीओला शेकडो लोकांनी पाहिलंय. हा व्हिडीओ नेटिझन्सनाही खूप आवडला आहे. काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये चार वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत खरेदीसाठी किराणा दुकानात पोहोचल्याचे दिसून येत आहे. यावेळी आईसोबत खरेदी करता करता या चिमुकली एका चिप्सचं पॅकेट उचलून बास्केटमध्ये ठेवते आणि आईला ते विकत घ्यायला सांगितले. पण आई हे चिप्स घ्यायला नकार देते आणि चिप्सचे पॅकेट परत ठेवायला सांगते. आता आईने चिप्स घ्यायला नकार दिल्यानंतर या चिमुकलीच्या चेहऱ्यावर निराशा येते. आपल्या जे चिप्स आवडतात ते खायला मिळणार नाहीत म्हणून ही चिमुकली थोडी नाराजही होते. पण ही चिमुकली फक्त यातच समाधानी होत नाही. या व्हिडीओमध्ये पुढे फ्रेममध्ये जे दिसतं ते पाहून तुम्ही हैराण तर व्हालच, पण नंतर पोट धरून हसाल.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता? होय, ड्रायव्हर विनाच धावू लागलं ट्रॅक्टर! पाहून तुम्ही म्हणाल, ‘जादू’
आईने चिप्स घ्यायला नकार तर दिलाय आणि तिला हे खायचंही होतं. यासाठी या चिमुकलीने एक भन्नाट शक्कल लढवलीय. या चिमुकलीने ते चिप्सचे पॅकेट हातात घेतलं आणि टर्रर्रकन फाडलं. त्यानंतर आईच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स दिसून आले ते मात्र पाहण्याजोगे आहेत. या चिमुकलीने चिप्सचं पॅकेट फोडलं म्हटल्यावर आता आईला ते चिप्सचं पॅकेट घेण्याशिवाय काही पर्याय उरलेला नसतो. अशी भन्नाट आयडिया वापरून अखेर या चिमुकलीने तिच्या आईला चिप्सचं पॅकेट घ्यायला भाग पाडलंच.
आणखी वाचा : Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : लग्नात नवरा नवरीने केला जबरदस्त क्लासिकल डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ videolucu.funny नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करून अजून २४ तास देखील उलटले नाहीत तर हजारो लोकांनी या व्हिडीओला पाहिलंय. चिमुकलीची भन्नाट आयडिया पाहून लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर विनोदी कमेंट्स शेअर केल्या आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.