महाराष्ट्रामध्ये विविध सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. पारंपारिक वेषभूषा परिधान करून पारंपारिक गाण्यावर नृत्य सादर केले जाते. गौरी-गणपतीच्या आगमनावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. कोणी ढोल ताशा पथकाचे वादन करत बाप्पाचे स्वागत करतो कोणी लेझिम नृत्य साजरे करतात. कोकणात बाल्या नृत्य किंवा शक्ती तुरा हे नृत्य प्रकार साजरे केले जातात. तर अग्री -कोळी बाधंव पारंपारिक वेषभुषा परिधान करून अग्री -कोळी गीतांवर नृत्य करताना दिसतात. सध्या अशाच एका कोळी गीतावर नृत्य करणाऱ्या माय-लेकींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माय-लेकींचा डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे.
व्हिडिओ tanvi_patil.2004 या इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये हा “चक चक सोन्याचा करा(कढा) कोणाच्या हाताचा” या कोळी गीतावर काही महिला कोळी वेशभूषा परिधान करून नृत्य करत आहे. या महिलांमध्ये एक माय-लेकीची जोडी देखील सहभागी झाली आहे. माय लेकीचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. काकूंच्या चेहऱ्यावरील हावभावांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. माय-लेकी दोघींनी नृत्याचा आनंद घेत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कशी वाटली मग आई आणि माझी जोडी? व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एकाने कमेंट केली की, “काकी खूप भारी”
दुसऱ्याने कमेंट केली की आईच्या चेहऱ्यावर बघ किती छान हसू आलं आहे.
तिसऱ्याने कमेंट केली की,”मुलीपेक्षा आई खूप छान नाचत आहे”
चौथ्याने कमेंट केली की, “आईच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि एनर्जी एक नंबर”