Mother daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंत:करण जड होतं. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. मात्र ज्या घरात मुलगी जाणार आहे तिथे तिचा नवरा तिच्यामागे भक्कमपणे उभा असले तर कोणत्याच आई-वडिलांना लेकीची काळजी वाटत नाही. अशाच एका जावयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलीचं लग्न लावताना लेक घरातून जातेय यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे, ही भावना वधूच्या मात्या-पित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतो असं समजावं. चांगला मुलगा, पती, भाऊ, मित्र अशा अनेक भूमिका निभावत असतानाच जावयाची भूमिकाही उत्तम वठवता येणं आवश्यक आहे. अशाच एका जावयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये त्यानं जे केलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल, प्रत्येक मुलीच्या आई- बापाला असाच जावई मिळावा!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपली लेक सासरी जाणार आहे म्हणून आई रडत आहे. लेकंही आता आपलं हक्काचं घर सोडून जाणार म्हणून रडताना दिसत आहे. यावेळी नवरीची आई जावयाच्या खांद्यावर विश्वासाने डोकं टेकवून रडतेय. मात्र हाच जावई काळजी करू नका असं सांगत आईला समजावताना दिसत आहे. समजून घेणारा नवरा आणि समजून घेणारा जावई भेटायला खरंच या जगामध्ये आता सध्याला तरी खूप नशीब लागतं, अशातच असं दृश्य आजकाल बघायला मिळत नाही. पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ हा जणू काही एक विधीच असायचा. म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागडया वस्तूसाठी अडून बसत असे. एवढंच काय तर अमूकच एक कोल्ड्रिंक प्यायला हवं म्हणूनही अडून बसलेल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत किंवा अनुभवल्या आहेत. मात्र अशा लोकांना पाहून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_wedding_55 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “असा जावई मिळाला तर प्रत्येक आई-वडील किती चिंतामुक्त राहतील” असं कॅप्शन लिहलं आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.