Deer Saves Her Baby From Jackal Attack : प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. परंतु, पिल्लांना वाचवण्यासाठी एका आईने (हरण) रुद्रावतार घेतल्याचं व्हिडीओ याआधी क्वचितच पाहिला असेल. पिल्लांना वाचवण्यासाठी काही प्राणी जीवाची बाजी लावतात आणि त्यांचं रक्षण करतात. वाघ,सिंहासारखे हिंस्र प्राणी छोट्या प्राण्यांची शिकार करतात. आताही एका खतरनाक कोल्ह्याने हरणाच्या पिल्लांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र, पिल्लांना वाचवण्यासाठी मादी हरणाने कोल्ह्याशी दोन हात केले आणि त्याला तुडव तुडव तुडवलं. हरणाचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
@Massimo नावाच्या ट्विटर यूजरने हरणाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, एक कोल्हा हरणाच्या पिल्लांची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचदरम्यान पिल्लांची आई (हरण) त्या ठिकाणी जाते आणि कोल्ह्यावर हल्ला चढवते. कोल्ह्याला भिडणाऱ्या हरणाने पिल्लांचा जीव वाचवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ४७ सेकंदाच्या या व्हिडीओ हरणाने बहादुरी दाखवता कोल्ह्याला पळवून लावल्याचं पाहायला मिळत आहे.
इथे पाहा हरण आणि कोल्ह्याचा थरारक व्हिडीओ
यूजर्स म्हणाले, ‘फक्त आईच असं करू शकते’
सोशल मीडियावर कोल्हा आणि हरणाच्या लढाईचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ४८ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला पाहून यूजर्सनेही हरणाच्या बहादुरीला सलाम ठोकला आहे. ‘फक्त आईच अंस करू शकते’, अशा प्रतिक्रियाही यूजर्सने दिल्या आहेत. जंगली कोल्हा शिकारी करण्यात माहीर असतो. परंतु, या हरणाने त्याची पळात भुई केली आणि पिल्लांना वाचवलं. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आई कोणतं धाडसं करू शकते, हे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.