Woman Driving Rickshaw With Her Toddler Video Viral : पोटच्या बाळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आई सर्वस्व पणाला लावते आणि पोटाची खळगी भरते. आई सारखे दैवत या जगात नाही असं म्हणतात आणि ते खरंच आहे. कारण आई आणि बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने इंटरनेटवर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लहान बाळाला कुशीत घेऊन आई इ-रिक्षा चालवत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने नेटकरी भावुक झाले. कुणीतरी या मातेला मदत करा, असं आवाहन नेटकऱ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून केलं आहे. आपल्या लेकराला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून एक आई किती संघर्ष करते, हे अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. बाळाला मांडीवर बसवून माता रिक्षा चालवत असताना प्रवाशांसी संवाद साधत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आई तिच्या बाळाला कुशीत घेऊन रिक्षा चालवत असताना रस्त्यावरील ग्राहकांना प्रवासाबाबत विचारत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. प्रवासी रिक्षात बसल्यानंतर ती माता रिक्षा चालवून पुढच्या प्रवासाला निघते.

नक्की वाचा – काय सांगता! उंदरांमुळे झाली दोन आरोपींची सुटका, पोलिसांच्या स्टोर रुममध्ये उंदरांनी खाल्ला २२ किलो गांजा

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच लाखो नेटकऱ्यांनी त्या मातेला सलाम ठोकला आहे. अनेकांनी त्या मातेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं प्रतिक्रियांच्या माध्यमातून समोर आलं आहे. तर काहिंनी तिच्या धाडसी वृत्तीचं कौतुक केलं आहे. व्हिरल भयानी नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा माय-लेकराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्यूज मिळाले असून शेकडो नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या मातेसाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मदतीची हाक मारली आहे.