आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात… मग तो माणूस असो किंवा प्राणी…त्यांच्यातील आईची ममता ही सारखीच. माणसांमध्ये महिला म्हणून भले तिला कुणी कितीही नाजूक, कमजोर, सौम्य हृदयाची म्हटलं तरी आई म्हणून जेव्हा तिच्या मुलांवर संकट येतं त्यावेळी स्वतःचा जीव पणाला लावून अख्ख्या जगाशी लढू शकते. मग समोर कुणीही असो….मुक्या प्राण्यांमध्येही अगदी असंच. जेव्हा त्यांच्या पिल्लांवर कुणी वाईट नजर टाकली तरी ते बड्या बड्या आणि घातक प्राण्यांसोबत सुद्धा लढू शकतात. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणी थेट मगरीशी भिडली. फक्त भिडलीच नव्हे तर पिल्लावर वाईट नजर टाकणाऱ्या मगरीचा या हत्तीणीने खात्मा केलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या हत्तीणीने आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी काय केलं ते पाहाल तर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती स्वतः मगरीच्या जबड्यात गेली. व्हिडीओत पाहू शकता की, हत्तीचा एक मोठा कळप नदीकिनारी पाणी पिण्यासाठी आला होता. नदी किनारी पाणी पित असताना नदीत आपल्यासमोर मोठं संकट आहे, याची कल्पनाही त्या हत्तींना नाही. सर्व हत्ती पाणी पित असताना त्या नदीतून अचानक एक मगर हळुहळु पुढे येत कळपातल्या हत्तीणीच्या एका पिल्लाला शिकार करण्याच्या प्रयत्नात असते. पिल्लाच्या बाजुलाच त्याची आई हत्तीणी देखील उभी असते. आपल्या पिल्लावर येणाऱ्या संकटाची जाणीव होते. आपल्या पिल्लावर मगर डोळा ठेवून आहे हे कळल्यावर मग काय क्षणाचाही विलंब न करता हत्तीणी मगरीच्या दिशेने धावत सुटते.

elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

हत्तीणी थेट मगरीशी झुंज देऊ लागते. यात हत्तीणी आपल्या सोंडेने आणि डोक्याने मगरीवर सपासप वार करू लागते. यात मगर कशीबशी आपला सूटका करण्याचा प्रयत्न करते. पण बलाढ्य हत्तीणीच्या समोर ती कमजोर पडते. हत्तीणी इतकी आक्रमक होते की मगरीची शेपूट आपल्या सोंडेखाली पकडून ठेवते आणि तिला फरफटत नेत नदीतच आपटू लागते. बराच वेळ हत्तीणी आणि मगर यांच्यातली झुंज रंगते. अखेर हत्तीणी या मगरीला नदीकिनारी फरफटत आणते. परंतू तो पर्यंत या झुंजीत मगरीने आपली हाचलाच थांबवलेली असते. आपल्या पिल्लावर डोळा ठेवणाऱ्या मगरीला शेवटी मारून टाकल्यानंतरच या हत्तीणीने मोकळा श्वास घेतला.

ही सर्व घटना डेनमार्कमधले टूरिस्ट हंस हेनरिक हार यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलीय. ही घटना आफ्रिकामधल्या झांम्बेझी नदी किनारी घडलीय. ही सर्व घटना शब्दात सांगणं कठीण आहे, परंतू आश्चर्यचकित करणारी ही घटना होती, असं वर्णन टूरिस्ट हंस यांनी केलंय.

‘Latest Sightings’ नावाच्या युट्यूब चॅनवरून या सर्व घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. गेल्या १९ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ शेअर केलाय. केवळ एका दिवसात या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ८२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. संपूर्ण जगाची ताकद आईच्या प्रेमासमोर हरते. आई हत्तीणीने आपल्या पिल्लाला मगरीच्या जबड्यातून वाचवलेलं पाहून या व्हिडीओला तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय.

Story img Loader