Mother Emotional Video : मुलांना लहानाचं मोठं करण्यासाठी जिनं रक्ताचं पाणी केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या आईला म्हातारपणी मुलांची साथ हवी असते. मुलं शिकून मोठी झाल्यावर आपल्याला म्हातारपणाची काठी बनून साथ देतील, अशी तिची अपेक्षा असते. आयुष्यभर काबाडकष्ट केले; पण वृद्धापकाळात तिच्या थकलेल्या शरीरात काम करण्याचे त्राण मात्र राहत नाहीत. त्यामुळे तिला स्वत: कमावून खाणं कठीण जातं. अशा परिस्थितीत पोटच्या मुलांनी सांभाळलं, तर ठीक; नाही तर कुठं जावं, अशा विवंचनेत ती वृद्धाश्रमाची वाट धरते. पण, वृद्धाश्रमात राहणाऱ्या आईच्या मनात काय भावना असतील याचा विचार कधी मुलं करतात का? ज्या मुलांना बोलायला, चालायला शिकवलं तीच मुलं जेव्हा आईला अडचण समजून वृद्धाश्रमात सोडतात तेव्हा त्या माऊलीच्या काळजाला किती वेदना होत असतील याचा विचार कधी मुलं करतात का? सध्या सोशल मीडियावर एका निराधार माऊलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एकटेपणामुळे खचलेल्या माऊलीचे शब्द ऐकून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आज अशी अनेक मुलं आहेत की जे, वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या सुखी संसारातील अडथळा समजून, त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट धरायला भाग पाडतात. आई-वडिलांनी उपसलेले कष्ट विसरून, ते बायकोच्या सांगण्यावरून आई-वडिलांना आपल्यापासून दूर करतात. अशा वेळी निराधार झालेल्या आई-वडिलांकडे स्वस्त:च्या नशिबाला दोष देत रडण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. मग तिला मुलाची कितीही आठवण आली, काळजी वाटली तरी ती त्याला भेटू शकत नाही. व्हायरल व्हिडीओतील आईच्या बाबतीतही तेच घडल्याचे तिच्या बोलण्यावरून समजतेय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

माऊलीचा एकेक शब्द ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत

पोटच्या मुलानं दूर लोटलं अशा वेळी वृद्धाश्रमात राहण्याशिवाय माऊलीकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे मुलाच्या आठवणीत धाय मोकलून रडत, ती देवाकडे लवकर मरण मागताना दिसतेय. यावेळी त्या माऊलीचा एकेक शब्द ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. माऊली सांगतेय, “कुठे माझा जन्म झाला, कुठे माझं सासर गेलं, कुठे मी मरणाच्या दारी येऊन पोहोचली. “भगवंता, तूपण सुखी राहा. आम्हालापण सुखी ठेव. देवा, मला मरण देशील, तर चालता-फिरता झटकन दे. मला असं लोळवत ठेवू नकोस.” यावेळी डोळ्यांत अश्रू दाटलेली ती माऊली सांगते, “माझं कोणी नाही रडायला. मीच माझी रडून मोकळी होते.” या आईचा एकेक शब्द काळजाला भिडणारा आहे. ते शब्द ऐकल्यावर डोळ्यांतून टचकन पाणी येईल, असे ते दृश्य आहे.

बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

हा अतिशय भावनिक असा व्हिडीओ @an.iket3764 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

“अरे, कुठे फेडाल ही पापं”, व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू

एका युजरने लिहिले की, “भगवंता, तूपण सुखी राहा. आम्हालापण सुखी ठेव.” -देवालापण सुखी राहा म्हणणारी एकमेव आई असते. दुसऱ्या युजरने लिहिले की, आईचा तळतळाट कुणालाच सुखी ठेवू शकत नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, त्या आईचा, माझं कोण नाही रडायला हा शब्द मनाला लागला राव. चौथ्या युजरने लिहिले की, आई ४ मुलांना सांभाळू शकते; पण ४ मुलं एका आईला सांभाळू शकत नाहीत ही खरी परिस्थिती आहे. शेवटी एका युजरने त्या आईच्या मुलाविषयी संताप व्यक्त करीत लिहिले की, आई-बापाला सांभाळू शकत नाहीत त्यांचा जगून तरी काय उपयोग आहे. ज्यांनी तुम्हाला घडवण्यासाठी पूर्ण आयुष्य सार्थकी लावले, त्यांना तुम्ही सांभाळू शकत नाही. अरे, कुठे फेडाल ही पापं.

Story img Loader