Viral video:पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते, अशीच एक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा आणि आई अन् लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या मुलाला किंवा मुलीला पोलिसांच्या वर्दीत पाहायचं अनेक आई-वडिलांचं स्वप्न असतं. अशाच आई एका आईचं आपल्या लेकीला वर्दीत पाहायचं स्वप्न पूर्ण झालंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
operation tumor Iraq girl, oral tumor Iraq girl,
मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आईनं आपल्या हातांनी मुलीला पहिल्यांदा पोलिसांची वर्दी घातली आहे. यावेळी आईसाठी हा अभिमानाचा तसेच भावनिक क्षण होता. आईच्या डोळ्यात लेकीचं कौतुक तुम्हालाही स्पष्ट दिसेल. प्रत्येक आईसाठी आपल्या मुलांचं यश हे जगातील सर्वात मोठं सुख आणि अनमोल क्षण असतो. हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा एक आई मुलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे. १८ सेकंदांच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बोरीवलीत पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा; पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने नागरिकांची मोठी गर्दी

मायेच्या सावलीत लेकरांना लहानचं मोठ करायचं आणि मग जगाच्या खड्ड्यात त्याला पडताना पाहणं पालकांसाठी कठीण असतं. पण या खड्ड्यातून तो सुखरुप बाहेर येऊन त्याचं स्वप्न पूर्ण करतो तो क्षण आई वडिलांसाठी जगातील सर्वात अनमोल क्षण असतो.

Story img Loader