जंगली प्राण्यांच्या लढाईशी संबंधित अनेक रोमांचक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांनाही हे व्हिडीओ पाहायला फार आवडतात. यामधील प्राण्यांचा थरार पाहण्यासारखा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिराफच्या पिल्लावर एका सिंहिणीने हल्ला केला आहे. मात्र, यानंतर या पिल्लाच्या आईने जे केले, ते पाहून सिंहिणीलाही धडकी भरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्या पिलांचे धोकादायक प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी या आई आपला जीव धोक्यात घालण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला याची प्रचिती येईल. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण जिराफच्या पिल्लावर हल्ला करते आणि त्याच्या मानेचा चावा घेते. सिंहिणीने या पिल्लावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. मात्र, तेव्हाच या पिल्लाची आई येते आणि तिला पाहून सिंहिणीला धडकी भरते.

Video: सेल्फी घेणाऱ्या मुलीला जो बायडेन यांनी दिली भन्नाट डेटिंग टीप; म्हणाले, “३० वर्षांची होईपर्यंत…”

हा धक्कादायक व्हिडीओ अ‍ॅनिमल पॉवर्स या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. पिल्लाला एकटं पाहून सिंहीण त्यावर हल्ला करते आणि त्याच्या मानेचा चावा घेते. मात्र आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जिराफ धावत पुढे येते आणि सिंहिणीवर हल्ला करायला जाते. जिराफला येताना पाहून सिंहीण घाबरते आणि ती पिल्लाला सोडून तिथून पळ काढते.

हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून नेटकरी या आईचे कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी कमेंट्स सेक्शन भरून गेला आहे.