जगभरात आईची तुलना ईश्वरासह केली जाते. संस्कृतमध्ये एक ओळ तुम्ही ऐकली असेल, ”कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति” या ओळीचा अर्थ असा,की एकवेळ पुत्र कुपुत्र (वाईट मुलगा) असू शकतो पण माता कधीही कुमाता (वाईट आई) असू शकत नाही. पण याला अपवाद ठरणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते असे मानले जाते पण सध्या एका आईवर स्वत:च्या बाळाचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळाचे रडणे थांबवण्यासाठी आईने ओलांडल्या सर्व मर्यादा

न्यूयॉर्क पोस्टनुसार, बाळ सतत रडत असल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी एका आईने त्याच्या दुधाच्या बाटलीमध्ये दारून ओतून त्याला पाजली. त्यानंतप ७ आठवड्याच्या चिमकुलीला दारूची नशा चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –ल्यूकेमियाग्रस्त १० वर्षाच्या मुलीने मृत्यूपूर्वी बॉयफ्रेंडसह केले लग्न, आई-वडिलांनी पूर्ण केली तिची शेवटची इच्छा

सॅन बर्नार्डिनो काउंटी शेरीफ विभागाने सोमवारी माहिती दिली की, ३७ वर्षीय ऑनस्टी डेला टोरे नावाच्या महिलेवर तिच्या मुलाचा जीव धोक्यात टाकण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १२.४५च्या सुमारास अमेरिकेतील लॉस एंजेलिसपासून ५५ मैल पूर्वेला असलेल्या रियाल्टो या दुर्गम भागात सरकारी प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले.

हेही वाचा – बारमध्ये जास्त दारू प्यायली तर आता घरापर्यंत पोहचवणार सरकार, ‘या’ देशात लागू केला नियम

चक्क दुधाच्या बाटलीत ओतली दारू

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, डेला टोरे ही रियाल्टोकडे जात असताना तिने बाळाचे रडणे थांबवण्यासाठी त्याच्या बाटलीत दारू ओतण्यासाठी थांबली होती. आता बाळावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, आईला $60,000 बॉण्ड पोस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आणि तिला वेस्ट व्हॅली डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in california fills bottle with alcohol to stop baby from crying snk