Viral video: सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. सासू- सुनेचं नातं म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कडाक्याच भांडण.अनेकदा या नात्यात खटके उडतात तर अनेकदा जोरदार भांडणही होतात.सोशल मीडियावर बऱ्याच या नात्याबद्दले अनेक गमतीदार किस्से दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा अनोखा आहे,ज्यात चक्क सासू-सुनेचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.

लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली.

या व्हिडीओमध्ये सासू आणि सून बिनधास्तपणे डान्स करत आहेत. कार्यक्रमात खानदेशी पद्धतीने हालगी वाजत असताना यात अनेकजण हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. मात्र या अनेकजणांमध्ये सासू-सुनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे,ज्यात त्यांनी अफलातून ताल धरला आहे. सासू-सुनेनं डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या दोघांनाही जोरदार दाद दिली आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by divya (@divya___3128)

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओdivya___3128 यांनी इन्स्टाग्राम अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे.याआधीही या कपलच्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आपल्या डान्समुळे अनपेक्षितपणे यासासू-सुना सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले.