Viral video: लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली…
सासू सून म्हटलं की लोकांना आठवतं ते भांडण. म्हणजे हे अगदी समीकरणच झालं आहे. जर सासू चांगली असली तर तिला सून भांडखोर मिळते. तर कधी सून चांगली असली तर तिला सासू भांडखोर मिळते. अनेक सुनांचं असं म्हणणं असतं की त्यांची सासू कटकट करते. हे करु नको, ते करु नको असा पाढा लावत असते. पण असं असलं तरी देखील सोशल मीडिया वर सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लोकांच्या मनात असलेल्या आणि अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सासू-सूनेच्या समीकरणाला खोटं ठरवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासू सुना “काखेत कळसा गावाला वळसा कशाला…तुमच्या पुढ्यात किसते मी ज्वानीचा मसाला” या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत आहेत. यावेळी त्या लाजतही आहेत मात्र तरीही त्यांनी डान्स थांबवलेला नाही. एवढंच नाहीतर काहीवेळानं सासरेही दोघींच्या डान्समध्ये सामील होत डान्स करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nakti_family0803 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “नशीबवान सून” तर आणखी एकानं “असे सासू-सासरे असतील कशाला भांडणं होतील” अशी प्रतिक्रिया दिली आहे.