सासू-सुनेची भांडण होणं सामान्य आहे. मात्र सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सासू-सुनेच्या विचित्र भांडणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या भांडणाचं कारण समजल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. हो कारण या घटनेतील सासूने आपल्या सुनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तिने आरोप केला आहे की, तिची सून तिच्या मैत्रिणीला घरी बोलावून गुटखा खाते, इतकेच नव्हे तर गुटखा खाल्ल्यानंतर ती घरात कुठेही थुंकते. तर सासूच्या तक्रारीनंतर आता हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचल्यानंतर पोलीस आणि समुपदेशकाने सासू आणि सुनेचे म्हणणे ऐकून घेतले. सासू-सुनेचा नेमका हा वाद आहे काय ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, सासू आपल्या सुनेच्या या कृत्याने इतकी नाराज झाली की तिने पोलीस स्टेशन गाठले आणि सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली. यावेळी सासूने पोलिसांना सांगितले की, माझी सून कुणाशी तरी ‘यार-यार’ म्हणत गुटखा खाते, इतकेच नव्हे तर गुटखा खाल्ल्यानंतर ती घरात कुठेही थुंकते. शिवाय सुनेला असं करु नको सांगितल तर ती माझं ऐकत नाही असंही सासूने सांगितलं.

हेही पाहा- काम असं करा की लोकांनी तुमच्यावर फुलांची उधळण केली पाहिजे, लोकांचं प्रेम पाहून भारावल्या IAS अधिकारी, व्हायरल VIDEO पाहाच

पोलिसांनी प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवले

पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे पाठवले. पोलीस व समुपदेशकाने सासू व सुनेचे म्हणणे ऐकून घेतले. जिथे सासूने गुटख्याचे रॅपर बरोबर आणले होते. सासूने पोलिसांना सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी तिच्या मुलाचे लग्न झाले होते. सासरच्या घरातील सर्वांशी नीट वागावे, अशी विनंती सासूने पोलिसांना आपल्या सुनेला समजावून सांगण्याची विनंती केली आहे. शिवाय तिची गुटखा खाण्याची आणि सर्वांशी यार म्हणून बोलण्याची सवय सोडवा, अशी मागणीही सासुने पोलिलांकडे केली आहे. तर या अनोख्या आणि विचित्र सासू-सुनेच्या भांडणाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.