बाळ जन्माला येण्यासाठी आईला नऊ महिने त्या दृष्टीने खूप काळजी घ्यावी लागते. बाळाच्या जन्मानंतरही शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आई अगदी काळजाच्या तुकड्यासारखं त्या मुलाला जपते, त्याची काळजी घेते. मुलाची आईसारखी काळजी या जगात कोणीच घेऊ शकत नाही आणि कोणालाच आईसारखी माया लावणे शक्य नाही, असं म्हटलं जातं.
आपल्या मुलांना आपल्या जीवापेक्षा जास्त जपणारी आई जेव्हा आपल्या त्या मुलांनाच सोडून निघून जाते तेव्हा आपल्या आईला भेटण्यासाठी त्यांची होणारी तळमळ खूप वेदनादायक असते. आपल्याला या आयुष्यात आणणारी आईच जर आपल्याला सोडून पळून गेली तर.… ही कल्पनाच मुलांना सहन न होणारी असते. सध्या अशीच काहीशी केविलवाणी दृश्यात्मक परिस्थिती एका ठिकाणी निर्माण झालीय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या दोन चिमुकल्यांना एका अनोळखी ठिकाणी सोडून पळून जाते.
आई की वैरीण
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये एक आई तिच्या दोन मुलांना घेऊन एका अडगळीच्या ठिकाणी घेऊन गेली. एक मुलगी अगदीच लहान असते. दोन्ही मुलांना एका अनोळखी जागेवर ती घेऊन जाते आणि त्यांना तिथेच सोडून पळ काढते. ती त्या चिमुकल्यांना सोडून गेलीय हे कळल्यावर एक मुलगा धावत तिच्यामागे जातो आणि दुसरा रांगत जातो.
आईचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kumar_quotes31 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “ऐसी माँ के लिए क्या कहना चाहोगे, जिसे अपने बच्चो से बढकर भी कुछ है” (अशा आईला तुम्ही काय म्हणाल, जिला आपल्या मुलांपेक्षाही जास्त काही महत्त्वाचे आहे.) व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ४.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “असं कोणती आई कशी करू शकते.” व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटलं. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं की, “त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”. एक जण कमेंट करत म्हणाला की, “अशी आई कोणाच्याच नशिबात न येवो.”