आजार छोटा असो किंवा मोठा औषध खाताना नेहमी आपल्याला डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच औषध घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून रुग्नाच्या जीवाला काही धोका पोहचू नये. त्याचबरोबर औषध खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासण्यास सांगितले जाते. तसेत नेहमी डॉक्टरांच्या प्रिस्किपनशिवाय खाऊ नये अशी शिफारस केली जाते. कारण औषध खरेदी करताना केलेली एक चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. दरम्यान सध्या औषध विक्रेत्याकडून झालेल्या एका चुकीमुळे घडलेली एक मोठी घटना सध्या चर्चेत आली आहे.
अमेरिकेतील एका महिलेला औषध विक्रेत्याने चुकून गर्भपाताच्या गोळ्या ( abortion pills) दिल्या ज्यामुळे गर्भवती महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. तिमिका थोमस नावाची ही महिला अमेरिकेतील लास वेगास शहरात राहते. महिलने २०१९मध्ये आई होण्याचा निर्णय घेतला होता पण ३० पेक्षा जास्त वय असल्यामुळे आणि पूर्वी झालेल्या काही ऑपरेशनमुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
गर्भधारणेसाठी येणाऱ्या अनेक कठीण परिस्थिती लक्षात घेता महिला आणि तिच्या पतीने आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया खूप जास्त खर्चिक असते. त्यात तिचे कुटुंब काही फार श्रीमंतदेखील नव्हते. पण या सर्व संकटाचा सामना करत चार मुलांच्या आई-वडिल असलेल्या या पालकांनी ठरवले की, “ते पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या आनंदाला अशी नजर लागेल याची कल्पना देखील त्यांनी केली नव्हती.”
हेही वाचा – ‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न
खरं तर, डॉक्टर्सने आयव्हीएफची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिलेला योग्य औषध लिहून दिले आणि हॉस्पिटलमधून सोडले. जे औषध लिहिले होते त्यामध्ये एका औषधाचे काम हॉर्मोन्सचे निर्मिती वाढवणे असे होते जेणेकरून गर्भधारणेसाठी मदत होईल. हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर महिला लास वेगास येथील सीव्हएस फार्मसी नावाच्या औषधाच्या दुकानात गेली आणि तिने औषधे खरेदी केली. महिला आणि तिच्या पतीला वाटले की, आता लवकरच ते पालक होतील.
चुकीचे औषध खाल्यामुळे झाला मुलांचा मृत्यू
द मिररच्या रिपोर्टनुसार, तिमिकाने औषधाचे दोन डोस घेतले आणि तिला जाणवले की काहीतरी गडबड आहे. तिने सांगितले की, ”तिला खूप जास्त वेदना होत होत्या.” जेव्हा तिने औषध पाहिले तेव्हा तिला समजले की,”तिने जे औषध खाल्ले ते गर्भपातासाठी दिली जाते. चुकीच्या औषधामुळे तिच्या पोटात वाढणाऱ्या दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. महिलेला हे समजताच तिला रडू कोसळले.”
हेही वाचा – बंगळुरूमध्ये फुटबॉल मॅचमदरम्यान विचित्र पोस्टर झालं व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
इतकी मोठी चूक झाली कशी?
ज्या दुकानातून महिलेने औषध घेतले होते, तिथे औषधांच्या कॅटलॉगमध्ये दोन टेक्निशिअन आणि दोन फार्मासिस्टने चूक केली होती. त्याच कारणामुळे तिमिकाला जे औषध घेण्यासाठी आली तेव्हा कॅटलॉगमध्ये झालेल्या गोंधळामुळे तिला चुकीचे औषध देण्यात आले. औषधाच्या दुकानाविरोधात खटला दाखल केला आहे. नेवाडा स्टेट बोर्ड ऑफ फार्मेसीने दुकान मालकाला सांगितेले की, ”त्यांनी महिलेला १० हजार डॉलर यांनी जवळपास आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.”