Shocking video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झालं असं की ही महिला आपल्या लहान बाळासाठी दूध घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली. पण दूध खरेदी करून परत येण्याच्या आत ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरु होताच महिला घाबरली आणि तिचे डोळे आपोआप पाणावले, आपल्या बाळाच्या विचाराने ती घाबरली. मग काय… ती वेड्यासारखी धावत्या ट्रेनचा पाठलाग करू लागली. पण ट्रेनच्या पुढे तिचं काय चालणार? ट्रेन पुढे निघून गेली आणि ती धावत्या ट्रेनकडे पाहून रडत बसली. पण तेवढ्यात एक चमत्कार घडला, धावती ट्रेन थांबली. आणि शेवटी आई-बाळाची भेट झाली. पण हा चमत्कार घडला कसा?

तसे पाहात रेल्वे कोणासाठी थांबत नाही, तिची वेळ झाली की ती निघून जाते. ज्यामुळे अनेकांच्या ट्रेन सुटली असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मग आता रेल्वेनं का आणि कशी ट्रेन थांबवली अशी देखील चर्चा आहे.खरंतर या महिलेचं मुल ट्रेनमध्ये होतं आणि ती आपल्या बाळासाठी दूध घ्यायला ट्रेनमधून उतरली असता ट्रेन सुरु झाली. ज्यानंतर ही महिला ट्रेनपाठी पळत होती, पण तिला ट्रेन पकडता आली नाही. ट्रेनच्या लोकोपायलटला ही गोष्ट कळताच त्याने महिलेला ट्रेन पकडण्यासाठी ट्रेन थांबवली, ज्यामुळे महिलेला ट्रेनमध्ये चढता आलं.दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक ट्रेन गार्डचे भरभरून कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader