Viral Video: सोशल मीडियावर आपण घरबसल्या संपूर्ण जगभरातील विविध गोष्टींबद्दलची माहिती काही क्षणांत मिळवू शकतो. दिवसेंदिवस लोकांच्या दैनंदिन आयुष्यात सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या सोशल मीडिया हा अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बरेच लोक सोशल मीडियाचा वापर स्वतःचे व्लॉग, व्हिडीओ शेअर करून प्रसिद्धी, पैसे कमावतात; पण कधी कधी या प्रसिद्धीसाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आजपर्यंत आपण असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये कोणी प्रसिद्धीसाठी रस्त्यावर अश्लील डान्स करताना दिसते; तर कोणी जीवघेणे स्टंट करताना दिसते. पण, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
आईच्या तिच्या मुलांवरील प्रेमाची तुलना कधीही कुठल्या नात्याबरोबर होऊ शकत नाही. आई रागावते, मारते, तसेच ती आपल्या मुलांवर प्रचंड प्रेमही करते. आपल्या मुलांना खरचटले तरी आईचा जीव कासावीस होतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे काहीतरी पाहायला मिळतय, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? Mother making reel for Baby Girl Funeral
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक परदेशातील महिला तिचा व्लॉग शूट करीत आहे; ज्यामध्ये ती तयार होताना दिसतेय. याच व्हिडीओमध्ये तिने आणखी एका व्हिडीओची क्लिप अॅड केली आहे; जो तिच्या लग्नातील व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करीत तिने व्हिडीओवर लिहिलंय, “हा व्हिडीओ मी माझ्या लग्नासाठी तयार होत असतानाचा आणि आता मी माझ्या बाळाच्या अंतिम संस्कारासाठी तयार होत आहे.”
म्हणजे ही महिला या व्हिडीओमध्ये तिच्या बाळाच्या अंतिम संस्कारासाठी तयार होत आहे, ज्याचा ती व्हिडीओ शूट करीत आहे. बाळाच्या अंतिम संस्कारावेळी तिचं हे धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @karissawidder या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १४.८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.