आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करते, त्यांची काळजी करते त्यासारखं प्रेम इतर कोणीच मुलांवर करु शकतं नाही असं म्हणतात. याचं उत्तम उदाहरण देणारा एका माकडीनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आईची आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठीची धडपड दिसून येतं आहे. शिवाय हा व्हिडीओ अत्यंत हृदयद्रावक असून नेटकरी तो पाहून खूप भावूक झाले आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाला वाचवण्यासाठी माकडाची आई कुत्र्यासमोर येते आणि स्वत:चा जीव धोक्यात घालत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहे.

हेही पाहा- लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! आईला होणारा उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी चिमुरडीची धडपड; डोळ्यात पाणी आणणारा Video Viral

Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माकडीन आणि तिचं पिल्लू एका बोटीत असताना दोन कुत्रे या मायलेकीची शिकार करण्याच्या उद्देशाने बोटीजवळ येतात. कुत्रे जवळ आल्याचं पाहताच माकडीन आपल्या मुलाला पोटाजवळ घट्ट पकडून ठेवते आणि स्वत:ची पाठ त्या कुत्र्याकडे करते. या व्हिडिओमधील या माकडीनीचे धाडस आणि त्याच्या मुलावरचे प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

माकडाने मुलाला कुत्र्यांपासून वाचवले –

हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला KGF चित्रपटातील ‘मॉं से बडा योद्धा और कोई नहीं’ हा डायलॉग आठवेल. कारण व्हिडिओमध्ये माकडीन तिच्या मुलाला काही होऊ नये यासाठी हल्ला करणाऱ्या कुत्र्यांकडं पाठ फिरवते. दोन्ही कुत्रे माकडीनीचा चावा घेतात, तिला ओरबडतात पण ती माकडीन मात्र, आपल्या मुलावर एक ओरखडाही पडू देत नाही.

नेटकऱ्यांमध्ये संताप –

हा व्हिडीओ @NazneenAkhtar10 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, ‘आई आईच असते ना? आपल्या मुलाला या कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.’ असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

मात्र या व्हिडिओवर अनेक नेटकरी संतापले असून त्यांनी हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीकडील माणुसकी संपली आहे की काय असा प्रश्न विचारत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की माकडीन तर तिचं कर्तव्य निभावताना दिसतं आहे. मात्र, व्हिडीओ बनवणाऱ्याला त्याच्या आईची आठवण झाली का नाही झाली? असा संतप्त प्रश्न कमेंटद्वारे विचारला आहे. व्हिडीओ बनवण्याऐवजी माकडीनीला कुत्र्यापासून वाचवायला हवे होते, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader