मातेच्या गर्भातच बालकांवर संस्कार होतात. महाभारतामध्ये अर्जूनचा मुलगा अभिमन्यूने देखील आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती.गर्भसंस्कारचा अर्थच हा आहे की गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. याची सुरुवात गर्भधारणेच्या आधी पासूनच होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आई तिच्या एका वर्षाच्या मुलाला क्लासिकल डान्स शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण मान्य करेल की मातेच्या गर्भातच बालकांवर संस्कार होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई तिच्या एका वर्षाच्या मुलाला शास्त्रीय नृत्य शिकवताना दिसत आहे. आईचा आवाज ऐकून मूलंही आईसारखं करण्याचा प्रयत्न करत आहे. तो खूप आनंदी दिसत असून हसतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, ‘संस्कार हा महासागर आहे आणि तो थेंब थेंब भरला जाऊ शकतो. संस्कार शिकवण्यासाठी वय नसते. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

देशाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाच्या युगात मुलांवरील संस्कार कमी होऊन ते हरवत चालल्याचे पाहायला मिळतात. परंतु आईच्या संस्कार हे व्यक्तीला ‎घडवण्यासाठी मोलाचे असतात. हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अनेकांच्या हा व्हिडीओ पसंतीस उतरला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: निर्दयी बाप! भर रस्त्यात पत्नीला अन् लेकराला कारमधून बाहेर पाडलं; चिमुरडा रडत राहिला तरीही…

व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ @iAkankshaP नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खूपच क्यूट व्हिडिओ.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘लहानपणापासून संस्कार करणारी आई’, तर दुसर्‍या युजरने लिहिले, ‘खूप सुंदर, मोबाईलपासून मुलांना लांबच ठेवायला हवे’.