लहान मुलांना पाळीव प्राण्यांसोबत खेळण्याची आवड असते. घरातील अंगणात खेळत असताना श्वान, मांजर यांना ते प्रेमाने जवळ घेतात. पण घराच्या आवरात काही प्राणी घातक असतात. रानावनात भटकणारे मांजरीसारखे दिसणारे काही वन्य प्राणी माणसांवर हल्ला करतात. इंग्लंडमध्येही एका घरातील प्रवेशद्वाराजवळ रॅकूनने (मांसभक्षक प्राणी) लहान मुलीवर हल्ला चढवला. मुलीच्या पायाला या हिंसक प्राण्याने जोरात चावा घेतला. पाय दातांमध्ये घट्ट पकडून या प्राण्याने त्या मुलीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आईने हे भयानक दृष्य पाहिल्यानंतर जे काही केलं, ते पाहून सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत.
मुलीवर हल्ला झाल्याचं आईने पाहिलं, त्यानंतर….
घरातील दरवाज्याजवळ रॅकून हिंसक प्राण्याने एका मुलीवर हल्ला केला. त्यानंतर संकटात सापडलेल्या त्या मुलीच्या किंचाळ्या घरात असलेल्या आईला ऐकू आल्या. क्षणाचाही विलंब न लावता मुलीला वाचवण्यासाठी आईने बहादूरी दाखवत त्या प्राण्याला अलगद उचलले आणि बाहेर फेकून दिले. खरंतर त्या प्राण्याने मुलीवर हल्ला करून दातात पाय धरून ठेवला होता. हे पाहिल्यानंतर तिच्या आईने प्राण्याला पकडलं आणि थेट बाहेर फेकून दिलं. या महिलेने मुलीला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला आणि प्राण्याच्या हल्ल्यापासून दोघांची सुटका केली. महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळं दोघांची त्या प्राण्याच्या हल्ल्यापासून सुटका झाली.
इथे पाहा व्हिडीओ
महिलेच्या या शूरपणाला सोशल मीडियावर कौतुकाची थाप मिळत आहे. होल्ड माय बिअर, होली काऊ या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजला आहे. जवळपास १४ लाख व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने व्हिडीओ शेअर करत त्या महिलेला मदर ऑफ द इयर असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटलं, तिने रॅकूनला बाहेर फेकल्यामुळं घरात दोघींना सुरक्षितपणे जाता आलं. महिलेनं दाखवलेला हा धाडसपणा जबरदस्त आहे.