सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अगदी मजेशीर वाटतात, तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करतात. असे व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी बाब व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.
आजकाल कधी कोणावर वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. काही जण या प्रसंगातून वेळच्या वेळी सावरतात आणि आपला जीव वाचवतात, तर काही जण घाबरून जाऊन कायमचे आपला जीव गमावतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक महिला सरकत्या जिन्यांवर (एस्केलेटर) चढत असताना एक भयंकर अपघात होतो. तिच्याबरोबर नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या.
भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन स्वयंचलित जिन्यांवरून येत असते. स्वयंचलित जिन्यांवरून उतरणार इतक्यात स्वयंचलित जिन्याचा एक भाग तुटतो आणि ती महिला त्यात पडते. पडताच क्षणी ती तिच्य़ा मुलाचा जीव वाचावा म्हणून त्याला बाहेरच्या बाजूला फेकून देते. तेवढ्यात तिथे काही माणसेदेखील जमतात. तिचा हात खेचून तिची मदत करण्याचादेखील प्रयत्न करतात. पण, तिला वाचवण्यात अपयश येतं आणि ती स्वयंचलित जिन्यांच्या तुटलेल्या त्या भागात पडते.
यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाहीय. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bozan.0202 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल मिलियन व्ह्युज ४.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “बापरे, असं बघून परत या स्वयंचलित जिन्यांवर चढायची भीती वाटेल.” दुसऱ्याने, “मला तर या जिन्यांवर चढायची आता हिंमतच नाही होणार,” अशी कमेंट केली. एकाने कमेंट करत लिहिले, “खूप वाईट झालं.”