आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपलं लेकरू अचानक गाडीसमोर आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आई आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकते.

हेही वाचा… VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत नवरा-बायको आणि त्यांची लहान मुलगी बाईकवर बसून आपल्या इच्छित स्थळी जायला निघत असतात. इतक्यात अचानक लहानगी बाईकवर बसण्याऐवजी रस्त्यावर पळत सुटते. गाड्यांच्या गर्दीत रस्त्यावर पळताना अचानक एक कार तिच्यासमोर येते. पण, असे घडण्याआधीच मुलीला पळताना पाहून आई लगेच बाईकवरून उतरते आणि क्षणाचाही विलंब न करता, तिच्यामागे पळत सुटते. मातेने तत्परता दाखविल्यामुळेच चिमुकली कारजवळ पोहोचण्याआधीच आई तिला पकडते आणि तोल गेल्यामुळे दोघी खाली कोसळतात. या घटनेमुळे आजूबाजूला गर्दी जमा होते. तेवढ्यात मागून मुलीचे वडीलदेखील धावत येतात आणि मुलीला लगेच उचलतात.

हेही वाचा… आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

@sp__prithivi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ‘अम्मा’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून ते आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल २.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. तर दुसऱ्याने, कारचालकाला धन्यवाद म्हणा. त्यानं मुलीला पाहताच कार थांबवली, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “आई नेहमीच महान असते.”

Story img Loader