सापाला समोर पाहिल्यानंतर भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. रानावनात गवतात भटकणारा साप घराजवळ आल्यावर अनेकांची पळता भूई होते. सापाच्या जवळ जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण करणे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. कारण विषारी सापांच्या दंशाने अनेक जणांच मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरातील दरवाजा उघडा असल्यास गवतात फिरणारा साप आपल्या घरात कधी प्रवेश करतो, याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. आपल्या बाळाला शांतपणे झोपवणाऱ्या आईला घरात साप घुसल्याचं कळतंच नाही. सुरुवातीला ती बाळाला झोपाळ्यात झेपा घालण्यात व्यग्र असते. मात्र काही वेळानंतर घरात भला मोठा साप आल्याचं तिला कळंत. त्यानंतर त्या मातेने बाळाला वाचवण्यासाठी जे केलं ते पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
नेमकं काय घडलं?
एका घरात आई तिच्या बाळाला झोपाळ्यात झेप घालत असते. बाळाला शांतपणे झोप लागण्यासाठी त्याची आई शांतपणे झोपाळ्यात बसलेली असते. पण घरात मोठा साप आला आहे, याचा अंदाजही तिला येत नाही. ती बाळाला झोपवण्यात खूप व्यस्त असते. पण साप जमिनीवर सरपटत जवळ येत असल्याचं तिला काही वेळानंतर कळतं. त्यानंतर ती तातडीनं झोपाळ्यातून बाळाला बाहेर काढते आणि पळून जाते. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
snakes video नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओत साप असल्याचं सुरुवातीला काही नेटकऱ्यांच्या निदर्शनात आलं नाही. “व्हिडीओ पाहत असताना माझं लक्ष बाळाकडेच होतं. सुरुवातील मला या व्हिडीओत साप असल्याचं समजलंच नाही, त्यामुळे मी हा व्हिडीओ दहा वेळा पाहिला.” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “हा व्हिडीओ मी दोनवेळा पाहिला, त्यानंतर मला साप असल्याचं दिसलं. खूप भयावह आहे.”