Mother Saves Her Child Video Viral : इंटरनेटवर काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घरात किंवा आजूबाजूला अचानक भयानक गोष्टी घडत असतात. पण लहान मुले घरात किंवा अंगणात खेळण्यासाठी जात असतात. घराचं बांधकाम धोकादायक असलं की छत कोसळ्याची शक्यता निर्माण होते. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली असून सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घराचं छत कोसळ्याच्या काही सेकंद आधीच आईने तिच्या बाळाला वाचवलं. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, ही घटना राजधानी नोम पेन्ह येथे घडली. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, घराच्या एका रुममध्ये तीन मुलं बसलेली असताना त्यांच्या आई एका बाळाला सांभाळत असते. घरात मोठा आवाज झाल्यावर आई तिच्या मुलांना घेऊन त्या ठिकाणाहून निघून जात असते. पण एक लहान मुलगा बेबी वॉकरमध्ये बसलेला असतो आणि त्याचदरम्यान घराचं छत कोसळतं. परंतु, त्या बाळाची आई जीव मुठीत घेऊन त्या मुलाजवळ जाते आणि छत कोसळण्याच्या काही सेकंद आधी त्याला वाचवते.
इथे पाहा व्हिडीओ
त्या मुलाच्या मातेने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, जर छत बाळाच्या अंगावर कोसळलं असतं, तर त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे मी लगेच त्या ठिकाणी धावले आणि छत कोसळण्याच्या आधी त्याला वाचवलं.घराचं बांधकाम करणाऱ्या कामगाराने सांगितलं की, घर बांधण्याच्या मूळ योजनेत कोणत्याही प्रकारची वॉटर-प्रूफिंग नव्हती. पावसामुळे छत कमकुवत झालं. त्यामुळे ही घटना घडली. लोक जेव्हा घर खरेदी करतात, त्यावेळी त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.