आपल्या मुलांच्या कला गुणांना वाव द्यायला प्रत्येक पालकांना आवडते. मुलांना नेहमी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आई-वडील करतात. अनेकदा पालक आपल्या मुलांसाठी आदर्श असतात. जेव्हाही मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळते तेव्हा ते आपल्या पालकांचे आभार व्यक्त करतात. त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतात. दरम्यान एका महिलेने तिच्या लेकीने लिहिलेला निबंध शेअर केला आहे. ‘माझी आवडती व्यक्ती’ विषयावर चिमुकलीला निबंध लिहायचा होता. चिमुकलीचा हा लेख वाचून तुम्ही पोट धरून हसाल.
क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजेच सर्जनशील लेखनाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका चिमुकलीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. ‘माझी आवडती व्यक्ती’ विषयावर लेखन करताना चिमुकलीने आई वडील किंवा शिक्षक अशा इतर कोणाबद्दल न लिहिता चक्क स्वत:बद्दल लिहिले आहे. हे पाहून तिच्या आईला आश्चर्य वाटले. महिलेने आपल्या लेकीच्या निबंधाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आपल्या लेकीच्या निबंधावर प्रतिक्रिया देताना, X वर ‘रेव्स’ नावाने अकांऊट असलेल्या महिलेने लिहिले की, “आवडत्या व्यक्तीबद्दल लिहायचे होते आणि माझ्या मुलीने स्वतःला निवडले.” मला मनातल्या मनात आशा होती की, ती मला निवडेल आणि तिने निवडलेल्या इतर कोणाचाही मत्सर करायला मी तयार होते पण हे माझ्या कल्पनेपेक्षा चांगले आहे”
हेही वाचा – हवेत उडताना दिसली गाय? पाहा व्हायरल व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे सत्य…
तरुण मुलीचा निबंध ७ मार्च रोजी पोस्ट करण्यात आला होता. स्वत: बद्दल चिमुकलेने निबंधामध्ये लिहिले की, “मला स्वत:ला मी खूप आवडते कारण मी स्पोर्ट डेनिमित्त खूप चांगले अँकर म्हणून काम केले होते. मला मी खूप आवडते कारण मी आत्मनिर्भर आहे. मला जोर जोराने ओरडायला आवडते. मला चित्र काढायला आवडते. मी खूप अधीर आहे. मला बसची वाट पाहायला आवडत नाही. मला सेकंदामध्ये शाळेमध्ये पोहचायचे असते. मला डायनॉसॉरचा इतिहास वाचून आश्चर्य वाटते कारण तो खरचं खूप रंजक आहे. ”
चिमुकलीचा आत्मविश्वास पाहून तिच्या आईला तिचा अभिमान वाटत आहे. चिमुकलीचा निरागसपणा नेटकऱ्यांच्या मनाला भावला आहे. ही पोस्ट आतापर्यंत ७७ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना ही पोस्ट फार मनोरंजक वाटली आणि मुलीला ‘आत्मविश्वासी’ म्हटले. “मला ती खूप आवडली. हे खूप सुंदर आहे,” असं एका वापरकर्त्याने म्हटलं आहे. “हे आवडले! कृपया हे जतन करा आणि फ्रेम करा आणि तिला तिच्या १८ व्या वाढदिवसाला तिला हे भेट द्या.” दुसर्या व्यक्तीने सांगितले. .