आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. असाच एक आई आणि मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही सेकंदांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेली दिसत आहे. रस्त्यावरून पादचारी ये-जा करत आहेत. मूल आईच्या कुशीत खेळत असते आणि आई मुलाचे लाड करताना दिसत आहे. खालील व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की आई कधी आपल्या मुलाशी बोलत आहे तर कधी त्याचे लाड करताना दिसते. आई आपल्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. आई आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे आणि लोक तो मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धक्कादायक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना १५ वर्षीय तरुणाला मृत्यूने गाठलं अन्…; नेमकं काय झालं?
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @@ChapraZila या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत यूजरने लिहिले – ‘गरीब आईचा राजकुमार’. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले – सर आई कधीच गरीब नसते. एकाने लिहिले – कोणतीही आई गरीब नसते. या व्हिडीओला लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक सुद्धा मिळत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाख ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत. प्रेमाचा, करुणेचा संदेश देणारा हा व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय.