बाळ जन्माला येण्यासाठी आईला नऊ महिने तिची खूप काळजी घ्यावी लागते. जन्मानंतरही शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आई अगदी काळजाच्या तुकड्यासारखं त्या मुलाला जपते, त्याची काळजी घेते. आईसारखी काळजी जगात कोणीच घेऊ शकत नाही आणि आईसारखी माया कोणालाच लावता येत नाही, असं म्हटलं जातं.
आपल्या मुलांना आपल्या जीवापेक्षा जास्त जपणारी आई जेव्हा आपल्याच मुलाचा घात करते तेव्हा त्या मुलाची तळमळ खूप वेदनादायक असते. आपल्याला या आयुष्यात आणणारी आईच जर आपल्या जीवावर उठली तर… सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्याच मुलाच्या जीवावर उठलीय.
आई आहे की वैरीण
आईचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या मनातही संतापाची लाट उसळेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्या मुलाबरोबर निर्घृण कृत्य करताना दिसतेय. आई लहानशा मुलाला जमिनीवर झोपवून, त्याचा गळा दाबत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. आईनं गळा दाबल्याने ते बाळ वेदना असह्य होऊन ओरडताना दिसतंय. हा व्हिडीओ त्याच ठिकाणी कोणीतरी रेकॉर्ड केला आहे, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
https://www.instagram.com/reel/DDUUbs2SADj/?igsh=X2RSVXVlakVT
हा व्हिडीओ @ram_ji_ke_sahare100k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात अला असून, ‘क्या ऐसी भी माँ होती हैं’ अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. या व्हिडीओला ६६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “मुलाला वाचवण्याऐवजी व्हिडीओ बनवतोय.” दुसऱ्यानं, “याची रील न बनवता, त्या महिलेची पोलिसांत तक्रार करा,” अशी कमेंट केली आहे. एक जण कमेंट करीत म्हणाला, “स्वत:च्या पोटच्या पोराबरोबर असं करायला तिला काहीही वाटलं नाही?”