आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम आई करत असते. अगदी लहानपणापासून काय चूक काय बरोबर हे ती आपल्या मुलांना शिकवते. त्याच संस्कारांनी, शिक्षणाने मोठी झालेली मुलं मनाने जास्त मोठी होतात, दुसऱ्यांचा आदर करायला शिकतात. पण, जर आईच मुलांना घडवायला चुकली तर त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं.
सध्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी आणि काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. काही जण जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक आई रील बनवण्यासाठी आपल्या मुलाबरोबर धक्कादायक कृत्य करताना दिसतेय.
रीलसाठी ओलांडली मर्यादा
महिलेचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही राग येईल. या व्हिडीओमध्ये एक महिला डान्स करताना दिसतेय. पण, डान्स करण्याआधी तिने हद्दच पार केली आहे. डान्स सुरू करण्याआधी तिने तिच्या चिमुकल्या मुलाला उचललं आणि बेडवर जोरात फेकून दिलं. एका रीलसाठी ती चिमुकल्याच्या जीवाशी खेळताना दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mithilajanjankiaawaj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “जेव्हा रील्स आपल्या मुलापेक्षा जास्त महत्त्वाची असते”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कॅमेरासमोर ही परिस्थिती असेल तर कॅमेरा बंद झाल्यावर ती मुलाशी कशी वागत असेल?” तर दुसऱ्याने “देवपण अशा लोकांना मुलं देतो” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “पागल, काहीतरी लाज बाळग, आपल्या आवडीच्या नादात बिचाऱ्या मुलाला फेकून दिलं.”