Mother Daughter Video: आई- मुलीचं नातं जिव्हाळ्याचं असतं. यासंबधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मन भारावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका आईने आपल्या मुलीला ती मोठी बहीण होणार असल्याचे सांगितले आहे. यावर मुलीने दिलेल्या प्रतिक्रियेने नेटकाऱ्यांची मने जिंकली आहेत. लोकांची मने जिंकली आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आई तिच्या मुलीला सांगते की तू लवकरच मोठी बहीण होणार आहेस. हे ऐकून पहिल्यांदा ती गोंधळून जाते. यानंतर ती चिमुरडी म्हणते की ती आधीच आर्ची या कुत्र्याची मोठी बहीण आहे. मग आई तिला पुन्हा समजावते आणि सांगते की लवकरच तुला एक भाऊ किंवा बहीण असेल. यानंतर ही चिमुरडी अतिशय गोंडस पद्धतीने तिला भाऊ किंवा बहीण कशी हवी आहे याबद्दल वर्णन करते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे.
गोंडस चिमुरडीचा व्हिडीओ येथे पाहा..
( हे ही वाचा: नवरीला उचलून नेताना नवऱ्याचा पाय घसरला अन्…; ‘त्या’ कृतीमुळे नेटकरी करतायत कौतुक)
navyathapliyal नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बर्याच लोकांनी मला विचारले की जेव्हा आम्ही मुलीला सांगितले की ती मोठी बहीण होणार आहे तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती. अर्धा वेळ तर मी याच विचारात होते की मुलाचा जन्म कसा झाला हे तिला कसं सांगू. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर कंमेंट देखील करत आहेत.