Shocking video: व्यसन ही अशी गोष्ट आहे की ती घरे उद्ध्वस्त करते आणि जेव्हा सर्व काही हाताबाहेर जाते तेव्हाच लोकांना याची जाणीव होते. अनेक प्रकरणांमध्ये, नशेत लोक घरातील वस्तूही विकतात. नशेमध्ये सगळं उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हादरून जाण्याची शक्यता आहे. आपण आजूबाजूला अशी अनेक मुलं मुली पाहतो जी नशेच्या आहारी गेलेली असतात. यावेळी अनेकदा पालकंही त्यांना कंटाळलेले आणि हताश झालेले पाहायला मिळतात.अशाच एका आईची आपल्या नशेच्या आहारी गेलेल्या मुलासाठीची तळमळ व्हिडीओतून समोर आली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण दारुच्या नशेत रस्त्यावर पडला आहे. तो नशेच्या इतका आहारी गेलाय की त्याला कसलंच भान नाहीये. तो डोळसुद्धा उघडत नाहीये. मात्र यावेळी त्याची आई त्याला सावरण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. भर उन्हात ही माऊली मुलासाठी धडपडत आहे. यावेळी संतोष बोरसे नावाचा एक तरुण हे सगळं पाहतो आणि त्या माऊलीच्या मदतीसाठी पुढे येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण दारुच्या नशेत असलेल्या तरुणाला उठवतो आणि रुग्णालयात घेऊन जातो. या तरुणाच्या कृतीतून माणूसकीचं एक उदाहरण समोर आलं आहे.
वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. म्हणूनच मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार होणं गरजेचं आहे.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ maratha_parivar96 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत, तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्हिडीओवर देत आहेत.