Viral Video: शालेय जीवनातील विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा शनिवार-रविवारची हक्काची सुट्टी; अभ्यास करण्यास मुलं कंटाळा करतात. तसेच हक्काची सुट्टी असते, तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना खूप अभ्यास किंवा प्रकल्प बनविण्यास देतात, अशी अनेक विद्यार्थ्यांचीसुद्धा तक्रार असते. अशातच जर शाळेतून विद्यार्थ्यांना कठीण प्रकल्प बनविण्यास दिला असेल, तर तो आई-बाबा, मोठे बहीण-भाऊ यांच्या मदतीने बनवून घेतला जातो. तर गृहपाठ विद्यार्थ्यांच्या बाजूला बसून आई व बाबा करून घेतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; त्यामध्ये एक आई सुट्यांच्या दिवसातील गृहपाठ व प्रकल्पांबद्दल (हॉलिडे होमवर्क) तक्रार करताना दिसली आहे.

व्हायरल व्हिडीओत आई तिच्या मुलाचा प्रकल्प पूर्ण करताना दिसत आहे. प्रकल्प पूर्ण करताना ती एक व्हिडीओ शूट करते आणि शिक्षकांकडे प्रेमळ व थोडंसं चिडून तक्रार करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना कठीण, न जमणारे प्रकल्प व अभ्यास सोपविल्याबद्दल ती टीका करते. तसेच व्हिडीओतून सांगताना दिसते की, शिक्षकांनासुद्धा माहिती असते की, असे कठीण व न जमणारे प्रकल्प शिक्षक पालकांकडून पूर्ण करून घेतात आणि स्वतः खेळायला जातात. नक्की आई प्रकल्प आणि गृहपाठाबद्दल काय बोलली आहे. व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…अरे हे चाललंय काय? पेट्रोल पंपावर श्रीमंतीचा माज; तरुणांनी पाण्यासारखं वाया घालवलं डिझेल, संतापजनक VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला तिची व्यथा मांडताना दिसते आहे. शनिवार-रविवार बहुतेक विद्यार्थ्यांना सुट्टी असते. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक सरकारी नोकरी करतात, त्यांनासुद्धा शनिवार-रविवार सुट्टी असते. मग व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हाच मुद्दा घेऊन आईनं व्हिडीओत तिचं मत मांडले आहे. ती शिक्षकांना सांगते की, विद्यार्थ्यांच्या क्षमतेशी जुळतील असे प्रकल्प शिक्षकांनी द्यावेत; जेणेकरून ते पालकांची मदत न घेता, स्वतःचे प्रकल्प स्वतः पूर्ण करू शकतील.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @WokePandemic ३० जून रोजी शेअर करण्यात आला आहे. ३० जून रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला ७.३ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. आईच्या या विनंतीवर अनेक नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे, “उत्पादन खराब झाल्यास ग्राहकाला दोष देणारा हा एकमेव उद्योग आहे.” दुसऱ्यानं सुचवले, “जर मी शिक्षणमंत्री असतो, तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठच दिला नसता.” तर तिसऱ्यानं कमेंट केली आहे, “प्रकल्प पालकांना ओझं का वाटतो मुलं शिक्षण घेत असताना त्यांचा सराव व्हावा म्हणून या गोष्टी केल्या जातात” आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.