“दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदीर हे, सत्य शिवाहून सुंदर हे”, लहानपणी शाळेमध्ये ही प्रार्थना आपण अनेकदा गायली आहे. पण त्याचा अर्थ कधी समजून घेतला आहे. आपल्या जवळ असलेले ज्ञान इतरांना दान केले तर त्या ज्ञानामुळे एखाद्याची प्रगती होते. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी फक्त इच्छा असावी लागते. शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद साजरा करण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते. मग की कोणतीही गोष्ट असो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिकण्याची उत्सुकता आणि शिकवण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वयस्कर महिला कार चालवताना दिसत आहे. तिच्या शेजारी तिचा मुलगा बसला आहे ज्याला आईला कार चालवताना पाहून खूप आनंद होत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

साई किरण कोरे नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला आनंद शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘माझी आई अॅक्शन मोडमध्ये आहे!! त्याच्या व्हायरल रीलचा न पाहिलेला भाग पहा.” सई किरणने व्हिडीओ पोस्टबरोबर त्याच्या आई अन्नपूर्णा कोरे यांचाही टॅग केले आहे.

हेही वाचा – गर्दी, गोंधळ अन्… अखेर धावत्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी ‘हा’ निवडला मार्ग; पाहा थक्क करणार व्हायरल VIDEO

आई आणि मुलगा गाडीच्या वेगावर चर्चा करत आहेत

व्हिडिओमध्ये कार चालवणारी आई आणि तिच्या शेजारी बसलेला मुलगाही एकमेकांशी बोलताना दिसत आहे. ते कारच्या वेगाबद्दल बोलत आहे. मुलगा त्याच्या आईला स्थानिक भाषेत सांगतो की, “गाडीचा वेग ताशी किलोमीटरमध्ये मोजला जातो.” बोलत असताना दोघेही खूप गोड आणि खळखळून हसत आहे. त्याचं स्मित हा व्हायरल व्हिडिओ रीलचा सर्वात सुंदर भाग आहे.

हेही वाचा – धक्कादायक! चिमुकल्या बाळाला हातात घेऊन धूम्रपान करतेय महिला, रिलसाठी ओलांडल्या सर्व मर्यादा, Video Viral

लाखो वापरकर्त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला

या रीलला आतापर्यंत २ लाख ८१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, २७ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यापैकी बऱ्याच वापरकर्त्यांनी व्हिडिओचे वर्णन खूप प्रेरणादायी असल्याचे सांगितले आहे. आई आणि मुलाच्या हसण्यामुळे हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिल्याचा दावाही प्रेक्षकांनी केला आहे.