आई-वडील हे आपल्या लेकरांवर निस्वार्थपणे प्रेम करतात. जितकं प्रेम आई-वडील करतात तितकं कोणीही करू शकत नाही. आपल्या आयुष्यातील अनेक लोक असतात जे काही नाही ज्यांना आपली कोणती ना कोणती गोष्ट आवडते म्हणून आपल्यावर प्रेम करतात, कोणाला आपले दिसणे आवडते, कोणाला आपला स्वभाव आवडतो कोणाला आपले व्यक्तीमत्व आवडते. पण आई-वडील असे असतात जे आपल्याला कोणत्याही अटीशिवाय निस्वार्थपणे आणि निर्मळ मनाने प्रेम करतात. आपले आई-वडील असे असतात जे आपल्यावर या जगात येण्याआधीपासून प्रेम करतात. एवढं काय तर आपल्यामध्ये कितीही कमतरता असल्या तरी आपल्यावर कायम मनापासून प्रेम करत राहतात. जेव्हा आपली मुलं आयुष्यात यशस्वी होतात तेव्हा आई-वडीलांना प्रचंड अभिमान वाटतो कारण लेकरांच्या यशातच आई-वडीलांचा आनंद असतो. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. मुलगा जिंकल्यानंतर एका आईला झालेला आनंद या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हायरल व्हिडीओने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

व्हिडीओमध्ये एका शाळेतील कौतुक सोहळ्यातील आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की जेव्हा व्यासपीठावर आपल्या लेकराचा सत्कार होतो तेव्हा त्याची आई धावत कशाप्रकारे व्यासपीठावर जाते. व्यासपीठावर जाताच प्रथमपाय मंचाच्या पाया पडते. आपल्या मुलाचे यश पाहून तिच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे जे पुसताना ती दिसत आहे. मुलाला मिळालेले पारितोषिक जेव्हा त्याच्या आईच्या हातात दिले जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अभिमान दिसून येतो. मुलाच्या मिळालेल्या पारितोषिकाकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. व्यासपिठावर उभ्या असलेल्या शिक्षिका मुलाच्या आईला गळाभेट देतान दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Dharmarakshak Sambhaji movie, Karad ,
सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा

हेही वाचा – आनंदाला वयाची मर्यादा नसते! चंद्रा गाण्यावर थिरकले आजोबा आणि नात, धमाल नृत्याचा Viral Video एकदा बघाच

व्हिडिओ इंस्टाग्रामवर lay_bhari_official नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एका आईला जितका आनंद आपल्या मुलांच्या जिंकण्यावर होऊ शकतो तितका कोणालाही नाही !” व्हाययरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “मुलाच्या यशाचा आनंद फक्त आईलाच होतो कारण आपल्या पेक्षा नऊ महिने तिने बाळाला जास्त जवळून अनुभवला असते.”

हेही वाचा –Fact check :”भारताला गोवण्यासाठी पन्नूने स्वतःवरच केला असावा हल्ला”, वॉशिंग्टन पोस्टच्या नावाने खोटा लेख चर्चेत, नेमकं काय आहे प्रकरण?

तिसऱ्याने लिहिले की, ” आई ही आई असते.”

Story img Loader