आई-वडील हे आपल्या लेकरांवर निस्वार्थपणे प्रेम करतात. जितकं प्रेम आई-वडील करतात तितकं कोणीही करू शकत नाही. आपल्या आयुष्यातील अनेक लोक असतात जे काही नाही ज्यांना आपली कोणती ना कोणती गोष्ट आवडते म्हणून आपल्यावर प्रेम करतात, कोणाला आपले दिसणे आवडते, कोणाला आपला स्वभाव आवडतो कोणाला आपले व्यक्तीमत्व आवडते. पण आई-वडील असे असतात जे आपल्याला कोणत्याही अटीशिवाय निस्वार्थपणे आणि निर्मळ मनाने प्रेम करतात. आपले आई-वडील असे असतात जे आपल्यावर या जगात येण्याआधीपासून प्रेम करतात. एवढं काय तर आपल्यामध्ये कितीही कमतरता असल्या तरी आपल्यावर कायम मनापासून प्रेम करत राहतात. जेव्हा आपली मुलं आयुष्यात यशस्वी होतात तेव्हा आई-वडीलांना प्रचंड अभिमान वाटतो कारण लेकरांच्या यशातच आई-वडीलांचा आनंद असतो. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. मुलगा जिंकल्यानंतर एका आईला झालेला आनंद या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हायरल व्हिडीओने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा