Girl Prank Video: सोशल मीडियावर अनेक प्रॅंक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो, खूप घाबरायला होतं. तर बरेचसे व्हिडीओ हे विनोदी स्वरुपाचे असतात. इतरांवर प्रॅंक करताना झालेली फजिती दाखवणारे व्हिडीओदेखील या माध्यमावर पाहायला मिळतात. असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या आईला घाबरण्यासाठी भूत बनण्याचे नाटक करते. पण शेवटी आपल्या आईची मस्करी करणं त्या तरुणीला महागात पडतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगी आईवर प्रॅंक करायचा असं ठरवते. बेडवर झोपलेल्या आपल्या आईच्या शेजारी ती मुलगी छोटा स्टूल आणि एक मोठी चादर घेऊन जाते. बेडवर स्टूल टाकून ती अंगावर चादर अशाप्रकारे ओढून घेते, जेणेकरुन ती हवेत उडत असल्याचा भास तिला पाहणाऱ्या व्यक्तीला त्यातही तिच्या आईला होईल. पण स्टूलवर झोपताना त्या मुलीचे संतुलन बिघडते आणि ती मागच्या बाजूला भिंतीवर कोसळते. हा अपघात झाल्याने तिच्या डोक्याला मजबूत मार बसतो. बाजूला झालेल्या आवाजाने मुलीची आई जागी होते आणि आपल्या मुलीला कळवळत असल्याचे पाहते. पुढे लगेच त्या मुलीच्या डोक्याचा जो भाग भिंतीवर आपटला, तो चोळायला लागते.

वयाच्या ७२ व्या वर्षी पूर्ण केले शिक्षण; ९२ वर्षीय आईच्या उपस्थितीमध्ये घेतली पदवी, Georgia मधल्या आजोबांची गोष्ट होतेय व्हायरल

हा विनोदी व्हिडीओ @HasnaZarooriHai या अकाउंटद्वारे ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. फक्त १३ सेकंदांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मस्करी म्हणून केलेला प्रॅंक अंगलट आलेल्या त्या मुलीवर नेटकरी हसत आहेत. बऱ्याचजणांनी हा व्हिडीओ अन्य यूजर्सना शेअर देखील केला आहे.