आपली आई आपल्याला जन्म देते त्याचबरोबर आपल्या जीवनातील पहिला गुरु देखील ही आपली आईच असते. आयुष्यभर आपल्या मुलांवर प्रेम करत जीवन जगण्याचे धडेही देत असते. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून विचार केला तर आपण आज जे काही आहोत, त्यामागे आपल्या आईचा मोठा आधार असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या आईसाठी लहानच असतो. मदर्स डे निमित्त एक व्हिडीओ आज तुफान व्हायरल होतोय. एक आई आपल्या मुलाला धडा शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
भर रस्त्यात आईने मुलाला फटकवलं
मुलाच्या हातात हेल्मेट आहे, पण त्याने ते घातले नव्हते. एवढ्यावरच आईला राग आला आणि रागाने समजावताना तिने मधेच त्याला एक-दोन चापटही मारली. यादरम्यान, मुलगा आईला सांगतो की तो जवळच जाणार होता म्हणून हेल्मेट घातलं नाही. तेव्हा आईने त्याला समजावले की ते आवश्यक आहे, कारण अपघातत कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: मृत्यूला दिला चकवा! रस्त्यावरुन चालताना काचेचा मोठा तुकडा डोक्यात पडला अन्…
मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे हेल्मेट घालणं खूप महत्वाचं आहे. पोलीस नेहमी याबाब जनजागृती करत असतात. मात्र तरीही तरुण मुलं याकडे दुर्लक्ष करतात.