Viral Video : आई ही आई असते. आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी वाट्टेल ते करते. प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा हीच आईची माया दिसून येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्यावर त्याची आई मदत मागण्यासाठी माणसांजवळ जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याविषयी अधिक माहिती नाही पण व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मादी बिबट्या दिसेल. हा बिबट्या माणसांजवळ जाऊन त्यांचा हात धरण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हा बिबट्या लोकांना त्रास देत आहे पण असे काही नाही. खरंतर या बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले त्यामुळे तो माणसांना मदत मागत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बिबट्या माणसांजवळ जातो त्यांचे हात पकडतो पण कोणीही त्याला मदत करत नाही पण जेव्हा लक्षात येते की बिबट्या मदत मागत आहे तेव्हा एक गाडी बिबट्याच्या मागे जाते आणि नंतर लक्षात येते की बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले आहे. पुढे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की पोलीस आणि काही माणसं बिबट्याचे पिल्लू बाहेर काढतात. बिबट्या मात्र हे दूरवरून बघत असतो. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

हेही वाचा : एसटी बसचालकाने बोनेटवर लिहिले असे काही की… तुम्ही चुकूनही त्यावर पाय ठेवणार नाही, Video एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘गुलिगत, एका बुक्कीत…’ सूरज चव्हाणचा ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “भावा, बिग बॉसमध्ये तुला फुल…”

एका इंस्टाग्राम अकाउंट करून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” लोक बघा कसे घेऊन पळताहेत जरा तरी माणुसकी दाखवा” तर एका युजरने लिहिलेय, “आईसारखी माया कुठेच नसते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईसाठी शब्द नाही.” एक युजर लिहितो, “आई काली माताही होऊ शकते बाळासाठी आणि ती कितीही कठोर असेल तरी शत्रूंसमोर झुकू पण शकते, फक्त बाळासाठी, एवढे समजलं” तर एक युजर लिहितो, “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. संपूर्ण जगातील मातृत्वाला सलाम” एक युजर लिहितो, “आईची माया ही न तुटण्यासारखी असते. याचे आणखी एक उदाहरण” हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून काही लोकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केलेत.