Viral video: आईला आपल्या मुलांचं किती कौतुक असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. जगानं झिरो म्हंटलं तरी तिच्यासाठी तिचा मुलगा हा नेहमी हिरोच असतो. मुलाचं प्रत्येक यश हे तिच्यासाठी मोठा सोहळा असतो. मुलाच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं कौतुक ते आयुष्यातील त्याची सर्वात मोठी कामगीरी, यामध्ये आईसारखं कौतुक कोणालाच वाटतं नाही. अशाच एका आई आणि मुलाचा विमानातील भावनिक व्हिडीओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झालं असं की ही महिला विमानाने प्रवास करणार असते, मात्र आपला पायलट मुलगा हेच विमान चालवणार आहे याची तिला कल्पना नसते. मात्र जेव्हा ती विमानात चढते तेव्हा त्या ठिकाणी मुलाला पाहून ती प्रचंड खूश होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलाला पाहून तिचा आनंद गगनात मावत नाहीये. मोठ्याने ओरडताना दिसते. मग ती त्याला घट्ट मिठी मारते. हे पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात. मुलाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना पाहून त्या आईला खूप आनंद झाला आहे, सोबतच मुलगा चालवत असलेल्या विमानात बसण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

हा व्हिडीओ goodnews movement या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये अभिमानी आई असं लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – मुलं लिफ्टमधून बाहेर पडताच १०व्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. अनेक मुलं असतात जे आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी तो लाईक केला आहे. तर या व्हिडिओने अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहले आहे की, मी आज इंटरनेटवर पाहिलेला हा सर्वात चांगला आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.