लिनोवो कंपनीने आपला मोटो सी प्लस हा स्मार्टफोन भारतात लॉंच केला होता. हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. त्याची किंमत सध्या ६९९९ इतकी असून यावर विशेष एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये जुना स्मार्टफोन दिल्यावर ग्राहकांना ६५०० रुपये इतके डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा नवा मोटो सी प्लस फोन खरेदी करायचा असल्यास केवळ ४९९ रुपये भरावे लागणार आहेत.
११ वर्षांच्या अर्णवचा बुद्धयांक स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त!
ऑनलाईन कंपन्यांकडून कायमच ग्राहकांना विविध ऑफर्स देऊन आकर्षित केले जाते. हेही त्याचेच एक उदाहरण आहे. मोटो सी प्लसच्या फाईन गोल्ड, पर्ल व्हाईट आणि काळा या रंगाच्या मॉडेलवर कंपनीने ही डिस्काऊंट ऑफर दिली आहे. याशिवाय अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्क्यांची जास्तीची सूट दिली आहे. काय आहे या स्मार्टफोनमध्ये विशेष जाणून घेऊया…
* ५ इंच एचडी डिस्प्ले
* १ जीबी/ २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज
* ३२ जीबी एक्पांडेबल मेमरी
* यामध्ये क्वाडकोअर मिडिया टेक MT6737 प्रोसेसर
* फोनला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
* ४ हजार मिलीअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आली आहे.
* याशिवाय कनेक्टीव्हीटीसाठी फोनमध्ये ४ जी वोल्ट, वाय-फाय, ब्लू टूथ ४.२, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत.