एका स्मार्टफोनने त्याच्या मालकाचा जीव वाचवला आहे. आता स्मार्टफोनने मालकाचा कसा जीव वाचवला हाच प्रश्न तुम्हाला पडलाय ना? तर ब्राझीलमधील एका माणसाचा जीव त्याच्या पाच वर्ष वापरत असलेल्या मोटोरोला स्मार्टफोनने वाचवला आहे. या घटनेत, सशस्त्र दरोड्यादरम्यान या माणसावर गोळी झाडली. मात्र या व्यक्तीच्या मोटो जी ५ स्मार्टफोनने खिशातून बुलेट थांबवली आणि त्याच्या मालकाचे प्राण वाचवले. यात तो स्मार्टफोन पुर्णपणे तुटला असला तरी यात विशेष बाब म्हणजे या फोनच्या मागच्या भागात लावलेला ‘द इनक्रेडिबल हल्क’ च्या फोटोमुळे मालकाचा जीव वाचला.

फोनच्या मागे होता हल्कचा फोटो

द हल्क बाय मार्वल कॉमिक्स हे एक काल्पनिक पात्र आहे ज्यात शक्ती आहे आणि तो त्याच्या अभेद्य जाड आणि हिरव्या त्वचेने गोळ्यांपासून वाचवू शकतो. डेली मेलमधील एका वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ब्राझीलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान दरोडेखोराने मालकावर गोळीबार केला.

पीडित व्यक्तीला केले रुग्णालयात दाखल

मोटो जी५ स्मार्टफोनने मालकाच्या कूल्ह्याला गोळी मारण्यापासून रोखले आणि मोठी इजा टळली. कूल्ह्यावर किरकोळ दुखापत झाल्याने मालक वाचला. या घटनेनंतर पीडित व्यक्तीला ब्राझीलच्या पेरनंबुको राज्यातील पेट्रोलिना येथील विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पूर्णपणे खराब झाला स्मार्टफोन

मोटो जी५ या स्मार्टफोनला गोळी लागल्याने या फोनचे नुकसान झाले. पीडित व्यक्तीवर उपचार करताना डॉक्टरांनी या फोनचा फोटो सर्वत्र शेअर केला. हा फोटो ट्वीटर वर शेअर करताना डॉक्टरांनी लिहिले की, ”दरोड्यात गोळी लागल्यानंतर रुग्णाला ईआरमध्ये दाखल करण्यात आले, आणि गोळी त्याच्या सेल फोनमध्ये लागलेली दिसली” यात फोनची तुटलेली स्क्रीन फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यातच या फोनच्या मागच्या भागात एक मोठा डेंट पडलेला देखील दिसत आहे. यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मोटोरोला जी५ हा एक मजबूत फोन म्हणून ओळखला जात नाही, परंतु ब्राझीलमध्ये त्याच्या मालकाला वाचवण्यामध्ये त्याने उत्तम काम केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर ६,३५५ वेळा पोस्ट करण्यात आले.

या ट्विटला शेकडो लाइक्ससह व्हायरल करण्यात आले आहे.

यात पीडित व्यक्तीची ओळख उघड केली नसली तरी डॉक्टरांनी सांगितले की ती व्यक्ति ठीक असून आणि त्या व्यक्तीला घरी पाठवण्यात आले आहे. श्री कार्व्हाल्हो यांनी एका ट्विटमध्ये संगितले की बरेच लोक रुग्णाबद्दल विचारत होते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना “लहान दुखापत” झाली आहे आणि त्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


फोनने एखाद्या व्यक्तीला बुलेटपासून वाचवण्याची ही पहिली वेळ नाही. काही वर्षांपूर्वी, तैवानमधील एक माणूस सॅमसंग गॅलेक्सी मेगा ६.३ स्मार्टफोनने बंदुकीच्या गोळीतून बचावला. त्या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली होती, पण ती गोळी त्याच्या शर्टच्या खिशात फोनने लागली होती, जेणेकरून ती त्याच्या छातीपर्यंत पोहोचू शकली नाही. ती व्यक्ती धोक्याबाहेर असल्याचे कळवले. मात्र त्या व्यक्तीचा फोन कोणतही काम मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हता.