Mount Everest 360 Degree Video Viral: माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत आहे. आजकाल माऊंड एव्हरेस्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात उंच पर्वताच्या शिखरावरून ३६० डिग्रीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये सर्वोच्च माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर गिर्यारोहक दिसत असून, ते हा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.
माउंट एव्हरेस्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असतो. चला जाणून घेऊया याबद्दल काही खास गोष्टी. आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांनी ९ हजारांहून अधिक वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. तीव्र थंडी आणि कमी ऑक्सिजनमुळे, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक आहे, त्याला चोमोलंगमा कोमोलंगमा आणि सागरमाथा देखील म्हणतात.
माउंट एव्हरेस्टला चोमोलंगमा किंवा कोमोलंगमा का म्हणतात?
माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. तिला तिबेटी भाषेत चोमोलंगमा किंवा कोमोलंगमा म्हणतात, ज्याचा अर्थ पृथ्वीची माता आहे. तर नेपाळी भाषेत याला सागरमाथा म्हणतात, म्हणजे आकाशाचा स्वामी. पाश्चिमात्य देशांमध्ये जॉर्ज एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. कारण त्यांनी १९व्या शतकात हिमालयाचे सर्वेक्षण केले होते.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ह वाचा: “आई मला मारणार नाहीस ना?” लहान मुलाचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच)
माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत नाही आहे
एक महत्वाची गोष्ट म्हणजे माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत नाही. उलट तो समुद्रसपाटीपासून सर्वात उंच पर्वत आहे. पण हवाईचा माऊना किया (Mauna Kea) पर्वत हा सर्वात उंच पर्वत आहे. हवाईच्या माऊना किया पर्वताचा शिखर पायथ्यापासून १०,२१० मीटर उंच आहे. परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची केवळ ४२०५ मीटर आहे.