सन २००७ साली जेव्हा ‘माय फ्रेंड गणेशा’ चित्रपट आला होता तेव्हा कित्येक मुलांच्या मनात भक्तीचा भाव निर्माण झाला. त्या चित्रपटामध्ये बाप्पाचे वाहन असलेल्या उंदीरमामाला मुषकराज असे म्हटले होते. ॲनिमेशन आणि कार्टुन स्वरुपातील तुम्ही उंदीर मामाचे बाप्पाच्या आरतीवर थिरकतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील प्रत्यक्षात असे कधी घडताना तुम्ही पाहिले नसेल. सध्या उंदरीमामांचा एक भक्तीमय व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे दृश्य दिसत आहे प्रत्यक्षात कधीही तुम्ही पाहिले नसेल.
जेव्हा कधीही आपण भक्तीगीत ऐकतो किंवा आसपास आरती सुरू असते तेव्हा आपण नकळत देवासमोर हात जोडतो किंवा टाळ्या वाजवतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे घडले पण एका उंदराबरोबर. या व्हिडीओमध्ये एक उंदीरमामा एका आरती ऐकून टाळ्या वाजवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
हेही वाचा – गोड आवाजात चिमुकल्याने म्हटले शिव तांडव स्तोत्र; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील एका मंदिराबाहेरील असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. जेव्हा हा व्हिडीओ शुट करण्याला आला तेव्हा त्या ठिकाणी आरती सुरू होते. आरती ऐकताच उंदीरमामा टाळ्या वाजवू लागले. आरतीच्या वेळी हा उंदीर नेहमी तिथे येऊन टाळी वाजवतो असे काही लोक मानतात. कोणीतरी हा व्हिडीओ शुट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारे या दृश्याच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. हा व्हिडीओ प्रभु ही चाहीये या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.