पुरुषांना दाढी-मिशी असणे स्वाभाविक आहे. आजकाल ते स्टेटस सिम्बॉलही बनले आहे. लोक दाढी-मिशा ठेवू लागले आहेत. ज्या मुलांच्या दाढी-मिशीची वाढ मंद आहे, त्यांना लाज वाटते. पण तुम्ही कधी मिशा किंवा दाढी असलेली स्त्री पाहिली आहे का? हे ऐकायला किंवा वाचायला विचित्र वाटेल पण केरळच्या कन्नूरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय शायजाला मिशा ठेवायला आवडतात. गेल्या पाच वर्षांपासून तिने मिशी कापली नाही आणि ती अभिमानाने ही मिशी सर्वांना दाखवते आहे.

मिश्या ठेवल्यामुळे शायजाला अनेकदा अपमान सहन करावा लागला आहे. लोक तिच्याकडे हीन भावनेने पाहायचे आणि तिच्यापासून अंतर राखायचे. असे असतानाही तिने हार मानली नाही. कालांतराने लोकही तिला स्वीकारू लागले आहेत.

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं

शायजा सांगते की, सामान्य महिलांप्रमाणे तिच्याही वरच्या ओठावर केस असायचे, पण त्यांची वाढ जास्त होती. त्यामुळे तिला नियमितपणे थ्रेडिंग करावी लागायची. मात्र, पाच वर्षांपूर्वी तिला मिशीचे केस दाट होत असल्याचे जाणवले, त्यानंतर तिने मिशा ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षांपासून तिने मिशीचे केस कापले नसल्याचे सांगितले. ती सांगते की, मला अनेकांनी मिशा कापायला सांगितल्या, पण मी त्या न कापण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते की मिशांमुळे मी सुंदर दिसत नाही असे मला कधीच वाटले नाही.

शायजा सांगते की तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले, पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. खरे तर तिला तिच्या कुटुंबाचा आणि मुलीचा खूप पाठिंबा मिळाला. ती म्हणते की, माझी मुलगी मला अनेकदा सांगते की तिला मिशा छान दिसतात. वास्तविक, विविध आजारांमुळे शायजावर सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ती म्हणाते, प्रत्येक वेळी मला वाटायचे की यानंतर मला काही त्रास होणार नाही, पण प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला आत्मविश्वास आला आणि मी मनाशी ठरवले की आयुष्य जसे आहे तसे जगायचे.

Viral Video : रस्त्यावरील स्टंटबाजी राखी सावंतला महागात पडली; मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

मात्र, शायजा ही दाढी-मिशा ठेवणारी एकमेव महिला नाही. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नुसार, २०१६ मध्ये, शरीर सकारात्मकतेची प्रचारक हरनाम कौर संपूर्ण दाढी ठेवणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली. ती अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये सांगते की तिला तिच्या चेहऱ्यावरील केसांमुळे त्रास दिला जाऊ लागल्यावर ती या केसांवर प्रेम करायला शिकली. आज ती मॉडेलिंग जगतात एक प्रसिद्ध नाव आहे.

Story img Loader