असं म्हणतात की, प्रेम आंधळ असतं. त्याला भाषा-वय-प्रांत अशी कसलीही मर्यादा नसते. अशा प्रकारची अनेक वाक्ये तुम्ही ऐकली असतील. असंच काही सांगणारी एक प्रेमकहाणी समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याच्या मुलाची आणि श्रीलंकेच्या मुलीची ही प्रेमकथा आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमाला ट्विटर संदेशवाहक कबूतर झाले आहे.

मध्यप्रदेशमधील मंदसौरमध्ये राहणारा गोविंद महेश्वरी आणि श्रीलंकातील हंसिनी यांच्यामध्ये सोशल मीडियावर प्रेम फुललं. प्रेमापोटी हंसिनी श्रीलंकेतून भारतात गोविंदला भेटण्यासाठी आली. चार वर्षानंतर एकमेंकाना सजल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी रोजी मंदसौरमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. हंसिनीचे वडिली पेशाने वकिल आहेत. तर गोविंदचे वडिल शेतकरी आहेत.

मध्यप्रदेशमधील कुंचडोद सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या गोविंद महेश्वरी आणि हसिंनी एदिरीसिंघे यांची ओळख ट्विटरवर झाली. २०१५ मध्ये ट्विटरवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली. दोन वर्षे टेक्स्ट मेसेज आणि व्हिडियो कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहिल्यानंतर २०१७ मध्ये हंसिनी थेरेपीच्या शिक्षणासाठी भारतात आली. त्यावेळी पहिल्यांदा गोविंद आणि हंसिनीची भेट झाली. त्यानंतर दोघांमधील बॉन्डिंग आणखी मजबूत झाले. नुकतेच गोविंदचे बीईचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

Story img Loader