Shocking Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या असाच एक मनाला चटका लावणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. मध्य प्रदेशातील रीवामधील एक तरुण त्याच्या मित्रांसह एका दुकानात हसत खेळत गप्पा मारत होता, मात्र याचवेळी अचानक ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हसतं खेळतं वातावरण अचानक दु:खात बदललं. तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

२० ऑक्टोबर रोजी रीवामधील बजरंग नगर येथील रहिवासी प्रकाश सिंह बघेल हा त्याच्या काही मित्रांसह एका दुकानात हसत- खेळत गप्पा मारत बसला होता, पण अचानक तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनी त्याला लगेच उचलले मात्र अचानक काय घडले हे त्यांनाही समजले नाही. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकजण दु:ख व्यक्त करत आहे.

मृत्यूचा लाईव्ह थरार

मित्रांच्या गप्पा गोष्टी सुरु असतानाच तरुण खुर्चीवरून पडला खाली

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रकाश बघेल नावाचा तरुण त्याच्या मित्रांसह दुकानात बसला होता. यावेळी मित्रांच्या गप्पा गोष्टी सुरु असतानाच प्रकाश अचानक खुर्चीवरून खाली पडला. मित्रांनी त्याला लगेच उचलले आणि टेबलवर बसवले, पाणी दिले पण काय घडले हे समजेस तोवर खूप उशीर झाला होता.

यानंतर मित्रांनी प्रकाशला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने प्रकाश यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा – VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांकडेही या घटनेने लक्ष वेधले आहे. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावपूर्ण दिनचर्या ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp rewa youth died while laughing talking with friends due to heart attack shocking video goes viral sjr