मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे तब्बल ५० लाखांचे दागिने आणि ५ लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही चोरी करणाऱ्या आरोपी महिलेस अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ती म्हणजे महिन्याला केवळ ८ हजार रुपये पगार असणाऱ्या या महिला आरोपीच्या घरात एसीपासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या महिलेकडे एवढा पैसा कोठून आला आणि तिने केलेली चोरी एका फोटोमुळे कशी उघडकीस आली ते जाणून घेऊया.

टीटी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी चैन सिंह रघुवंशी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले की, टीटी नगर पोलिस स्टेशन परिसरात निशात कॉलनीत राहणारे डॉ. भूपेंद्र श्रीवास्तव यांनी त्यांच्या घरातून मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. भूपेंद्र यांचे शाहजहानाबाद परिसरात खासगी रुग्णालय आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत लिहिले होते की, मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरातील अनेक मौल्यवान दागिने आणि पैसे चोरीला जात आहेत. चोरीच्या संशयावरून आम्ही २० दिवसांपूर्वी घरातील मोलकरणीला कामावरुन काढून टाकले होते.

Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
All India Pregnant Job (Baby Birth Service)' and 'Playboy Service
Bihar Scam : अपत्यहिन महिलांना गरोदर करा अन् ५ लाख मिळवा; बिहारमध्ये अनोखा स्कॅम; पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश!
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
honey extension scam
Honey Scam Controversy : लोकांना बेस्ट कूपन कोड शोधून देणार्‍या ‘हनी’वर गंभीर आरोप; युट्यूबरच्या दाव्याने खळबळ
ncpi google pay phonepe loksatta
‘एनसीपीआय’कडून ‘गूगलपे’ आणि ‘फोनपे’ला कोणता दिलासा? याच दोन कंपन्यांची डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात मक्तेदारी का?

हेही पाहा- मुलीने सांगितलेलं काम केलं नाही म्हणून रागवले वडील, भावनिक स्टेटस टाकत व्यक्त केलं दु:ख; Viral पोस्टची Swiggy कडून दखल

डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या पत्नीकडे मोलकरणीचा व्हॉट्सअॅप नंबर आहे. पत्नीने मोलकरणीच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा फोटो पाहिला तेव्हा मोलकरणीने कानात घातलेले झुमके ही तिचेच असल्याचा संशय पत्नीला आला. त्यानंतर पत्नीने लॉकर उघडून पाहिले असता तिचे कानातले झुमके गायब झाल्याचं तिला समजलं. त्यामुळे मोलकरणीनेच घरातील दागिने चोरल्याचा संशय आम्हाला आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

चोरी केल्याचं मोलकरणीने मान्य केलं –

हेही वाचा- “गाडी बंगल्यासह पगार दुप्पट हवा” पठ्ठ्याने लग्नासाठी बनवली लांबलचक यादी, होणाऱ्या बायकोकडून ठेवलेल्या अपेक्षा वाचून थक्क व्हाल

डॉक्टरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने आपण डॉक्टरांच्या घरात चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून बांगड्या, टॉप्स, नेकलेस आणि सोन्याच्या बांगड्यांसह ५० लाखांचे दागिने जप्त केले आहेत. यासोबतच साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त केली.

मालकीण घरात नसताना करायची चोरी-

पोलिस चौकशीत आरोपी महिलेने सांगितले की, डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह घराबाहेर गेल्यानंतर ती घरात चोरी करायची. शिवाय एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर ती मालकिनचेच दागिने घालायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला डॉक्टरांच्या घरी काम करण्यासाठी ८ हजार रुपये पगार मिळत होता. तर तिचा नवरा कंत्राटी पद्धतीने कामावर जातो. महिना १५ ते २० हजाराचे उत्पन्न असलेल्या या महिलेच्या घरात एसी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अनेक सोयी सुविधा असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Story img Loader