मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेला मुलगा इन्फ्लुएन्सर होता. या मुलाने ओढणी वापरून गळफास घेतल्याचं सांगितलं जात आहे. ही आत्महत्येची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.
मृत मुलाने घरात कोणी नसताना आत्महत्या केली. एका पोलीस नागझिरीचे पोलीस अधिकारी कमल सिंग गेहलोत यांनी सांगितलं की, हा मुलगा सोशल मीडियावर खूप सक्रिय होता शिवाय तो खूप फेमस इन्फ्लुएन्सर होता, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाऊंटद्वारे विविध माहिती गोळा केली जात आहे. परंतु या आत्महत्येचे ठोस कारण समोर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही पाहा- Video: तलावातील पाणी क्षणात पोहोचवलं शेतात; शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही कौतुक कराल
मृत मुलाने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, ज्यामध्ये त्याने मेकअप करुन, साडी घातली होती, नेलपॉलिश आणि इतर पारंपारिक कपडे घातले होते. या अल्पवयीन मुलाने आत्महत्या कशी आणि का केली? यामागचे कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही, परंतु काही युजर्सनी क्रॉस ड्रेसिंगमुळे आणि त्याने साडी घातल्यामुळे ट्रोल केल्याचं अहवालात म्हटलं आहे.
दिवाळीनिमित्त मृत मुलाने साडी नेसून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर यूजर्सनी त्याला ट्रोल केलं होतं. त्यामुळे ट्रोलिंग आणि मुलाच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस तपास करत आहेत. स्टेशन प्रभारी गेहलोत म्हणाले, “मी ऐकलं आहे की, विद्यार्थ्याने नेलपॉलिश लावली होती.” पोलिस अधिकाऱ्याने असेही सांगितलं की, व्हिडिओ फुटेज, त्यावर केलेल्या कमेंट्स तपासून पुढील कारवाई केली जाईल.