Shocking video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. कारण या नियमांची निर्मिती जनतेच्या सुरक्षेसाठीच करण्यात आली आहे. तसेच या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून जागोजागी ट्रॅफिक पोलीस तैनात असतात. जर तुम्ही नियम तोडले तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अर्थात या पोलिसांना दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. किंवा अगदीच संशयास्पद परिस्थिती असेल तर ते वाहनाची झडती घेऊ शकतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. असाच एक प्रकार आता मध्यप्रदेशमधून समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती वाहतूक पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे. याचं कारण असं की या व्यक्तीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले होते. व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, चेकिंगदरम्यान एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला थांबवले, त्यानंतर त्या व्यक्तीने कॉन्स्टेबलशी वाद घालायला सुरुवात केली. या व्यक्तीनं अक्षरश: ट्रॅफिक हवालदाराच्या कानाखाली लगावली. यानंतर इतर पोलिसांनी आणि नागरीकांना या व्यक्तीला मध्यस्थी करत थांबवले आणि चोप दिला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> कपड्यांच्या दुकानात दोन बैलांचा राडा; अख्ख दुकान केलं रिकामं; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
घर के कलेश नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. युजर्स व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका युजरने लिहिले… कोणीही असंच भांडत नाही, चूक दोन्ही बाजूनेही झाली असावी. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…तो एका आमदाराचा मुलगा आहे असे दिसते. तर दुसऱ्या यूजरने लिहिले…असे भांडणे योग्य नाही, त्याला तुरुंगात टाका.